Eknath Shinde latest news, Shivsena Political Crisis  
मुंबई

याचा पक्षश्रेष्ठींनी विचार करावा...; शिंदेंच्या नाराजीनंतर शिवसेना नेत्याचे सूचक विधान

Political crisis in Maharashtra| शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे १७ आमदारांसह गुजरातमध्ये

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ''एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार नाराज आहेत याचा पक्षश्रेष्ठींनी विचार करायला हवा. एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांनी भाजपसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचे बातम्यातून पाहिले. याबाबत जो पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्याला माझा पाठिंबा असेल,'' अशी भूमिका शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच, एकनाथ शिंदे मोठा नेता आहे, ते जाऊन चालणार नाही ते आम्हाला हवेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याबाबत चर्चा करणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. (Eknath Shinde latest news)

राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या 17 समर्थक आमदारांना सोबत घेऊन गुजरातेतील सुरत गाठले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे 17 आमदारांसह सुरतमध्ये एका हॅाटेलमध्ये असल्याची चर्चा आहे सुरुवातीला 17 आमदार सोबत असल्याचे सांगण्यात येत होते. पण गेल्या तीन तासांत झालेल्या घडामोडींमध्ये ही संख्या आता २२ वर पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. (Shivsena Political Crisis)

- एकनाथ शिंदे नाराज का

विधान परिषदेच्या निवडणूकीतील धक्कादायक पराभवानंतर राज्यातील राजकारणात वेगाने घडामोडी घडताना दिसत आहेत. पण गेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात नाराजी असल्याच्या चर्चा सुरु होत्या.

महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून एकनाथ शिंदे यांची नाराजी सुरू झाली असल्याचे बोलले जात होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असताना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत एकनाथ शिंदे यांचे नाव आघाडीवर होते. एकनाथ शिंदेंची शिवसेनेप्रतीअसलेली निष्ठा आणि पक्षातील स्थान यामुळे हे पाहता मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. पण त्यावेळी अचानक उद्धव ठाकरेंच्या हाती राज्याची धुरा गेली. तर एकनाथ शिंदे यांना नगरविकासह महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात आली. पण मुख्यमंत्रीपदासाठी डावलल्याची सल त्यांच्या मनात होती.

त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळी महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली. पक्षविस्ताराच्या दृष्टीने ही खाती जनतेशी थेट संबंधित असल्याने महत्त्वाची होती. पण राज्य सरकारमध्ये नगरविकासह महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी असतानाही शिंदेंना मनासारखं काम करू दिले जात नसल्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे वारंवार केल्या जात होत्या. त्यामुळेही शिंदे नाराज असल्याचे बोलले जात होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT