Gunaratna Sadavarte
Gunaratna Sadavarte sarkarnama
मुंबई

जामिनावर सुटका होताच गुणरत्न सदावर्तेंनी केली ही घोषणा...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यानंतर वकिल गुणरत्न सदावर्ते (gunratan-sadavarte) यांच्या विरोधात महाराष्ट्रत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हल्ल्याच्याच दिवशी ८ एप्रिल रोजी सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, आज उच्च न्यायालयाने सदावर्ते यांना जामीन मंजूर केल्यामुळे त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.

तुरुंगातून सुटका होताच सदावर्ते यांनी घोषणा दिल्या. हम है हिंदुस्थानी, भारताच्या संविधानाचा हा विजय आहे. भारताच्या संविधानापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. माझी मुलगी झेन सदावर्ते आणि माझी पत्नी जयश्री पाटील, त्यांच्या सोबत राहून माझ्या मित्र परिवाराने या अन्याया विरुद्ध मला सोबत दिली. महाराष्ट्रातल्या देशातल्या हिंदुस्थानी कष्टकरी स्वागताला आले आहेत. ते आमचा पुढचा केंद्र बिंदू असेल. भ्रष्टाचार आणि या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जेजे करता येईल ते सर्व आम्ही करु, असे सदावर्ते म्हणाले.

दरम्यान, सदावर्ते यांच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये मुंबई, सातारा, कोल्हापूर या येथील पोलीस ठाण्यात सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. कोल्हापूर पोलिसाना न्यायालयाने दिलेली कोठडी सोमवारी संपल्यानंतर सदावर्ते यांनी मुंबईतील आर्थररोड कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता कोर्टाने दिलासा देत जामीन मंजूर केला. त्यामुळे 19 दिवसानंतर सदावर्ते यांची सुटका झाली. त्याना घेण्यासाठी त्यांची मुलगी, पत्नी व कार्याकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT