Mumbai News : सुप्रीम कोर्टाने गुरूवारी दिलेल्या निकालामध्ये क्रिमिलेअरचा मुद्दा उपस्थित केल्याने पुन्हा चर्चांना तोंड फुटले आहे. न्यायालयानं अनुसूचित जाती व जमातींच्या आरक्षणाबाबत गुरूवारी (ता.1) महत्वाचा निकाल दिला आहे.
एससी आणि एसटीमध्ये सामाजिक आणि आर्थिक सक्षम असलेल्या लोकांना क्रिमिलेअर लागू केल्यास खऱ्या गरजूंना, वंचितांना आरक्षण मिळू शकेल,असं सूचक विधान कोर्टाने केलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयालाच्या या निकालालाच वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी आव्हान दिलं आहे.
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एससी, एसटी आरक्षणाबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निकालावर आक्षेप नोंदवला आहे. या निर्णयाच्या विरोधात रिट पिटिशन दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
सदावर्ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा आरक्षणाचा मूळ हेतू बदलणारा आहे. तसेच राज्यातील आगामी निवडणुकांवर प्रभाव टाकणारा आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल चुकीचा असल्याचा दावा सदावर्ते यांनी केला आहे.
देशात सध्या केवळ ओबीसी प्रवर्गामध्ये क्रिमिलेअरची व्यवस्था आहे. यामध्ये आठ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न गटाला आरक्षणाचा लाभ मिळत नाही. हीच व्यवस्था एससी व एसटी आरक्षणामध्येही लागू करण्याबाबत कोर्टाने केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे. कोर्टाने राज्यांना याबाबत अधिकार असेल, असे म्हटले आहे.
एससी,एसटी आरक्षणामध्ये किमिलेअरच्या आधारवर कोटा निश्चित करण्याबाबतची चर्चा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. कोर्टातही हा मुद्दा पोहचला. पंजाब आणि आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये क्रिमिलेअरच्या आधारावर उपवर्गीकरण बनवून कोटा निश्चित करण्याचा प्रयत्न झाला होता. पण त्यासमोर कायदेशीर आव्हाने उभी राहिली होती.
अनुसूचित जाती व जमातींच्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने गुरूवारी महत्वाचा निकाल दिला आहे.या निकालाचे अनेक दुरगामी परिणाम होऊ शकतात.एससी आणि एसटी आरक्षणामध्ये क्रिमिलेअर लागू करण्याबाबत कोर्टाने आपले म्हणणे मांडले आहे.
सुप्रीम कोर्टाने गुरूवारी दिलेल्या निकालामध्ये क्रिमिलेअरचा मुद्दा उपस्थित केल्याने पुन्हा चर्चांना तोंड फुटले आहे. एससी आणि एसटीमध्ये सामाजिक आणि आर्थिक सक्षम असलेल्या लोकांना क्रिमिलेअर लागू केल्यास खऱ्या गरजूंना, वंचितांना आरक्षण मिळू शकेल, असे सूचक विधान कोर्टाने केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.