Mumbai News : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समजाला आरक्षण द्यायचेच नाही. माझ्यावर नसते आरोप करून आंदोलनात फूट पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्यांनी मला संपवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. त्यांना माझा बळी हवा आहे, असे गंभीर आरोप करत आक्रमक झालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांनी खुले आव्हान दिले. फडणवीसांनी माझा बळी खुशाल घ्यावा, मीच सागर बंगल्यावर येतो, असा इशारा देत जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावर आता जरांगेंच्या आंदोलनाविरोधात याचिका करणारे वकील गुणरत्न सदार्ते यांनी जरांगेंच्या या कृतीमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप करत जोरदार टीका केली आहे. (Gunratna Sadavarte On Manoj Jarange Patil News)
सदावर्ते म्हणाले, "शाळेच्या - महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू असताना महाराष्ट्राला वेठीस धरण्याचं, राज्याला अशांत करण्याचं काम जरांगेंनी चालवलं आहे. यासंदर्भात महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. असे असतानाही जरांगेंनी 'हम करे सो कायदा'प्रमाणे अंतरवालीतून निघून अमुकाच्या घरी जातो, तमुकाच्या घरी जातो आणि बघा काय होतंय? मी जाव देतो, या प्रकारची भाषा बोलत आहेत. समाजाला उत्तेजित करत आहे. रस्त्यावर लोक यावेत या भानगडीत जरांगे आहेत," अशा शब्दात आक्रमकपणे त्यांनी जरांगेंवर टीका केली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, संयम सुटल्याने जरांगेंच्या भावनांचा मोठा उद्रेक झाला. हे ओळखून तेथे उपस्थित समाजबांधवांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पाटील.. पाटील शांत राहा. दादा.. दादा स्वतःला सांभाळा. पाटील आम्हाला तुम्ही हवे आहेत, आरक्षण नंतर. आपण जाऊ पण आधी उपोषणामुळे तब्येतीची काळजी घेऊ, अशी आर्जव करण्यात आली. मात्र जरांगे पाटील कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी तडक व्यासपीठ सोडले आणि मुंबईतील फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) शासकीय निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत.
मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) फडणवीसांवर आंदोलनात फूट पाडण्यासाठी सर्व प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्यातीलच बारस्कर यांना पुढे केले. त्यांना मराठ्यांना मोठे होऊ द्यायचे नाही. असे म्हणत फडणवीसांनी कुणाकुणाला कसे संपवले, याची यादीही सांगितली. त्यांना माझा बळी हवा असेल तर घ्यावा. मी सागर बंगल्यावर येतो, त्यांनी माझ्यावर गोळ्या झाडाव्यात. मात्र मी मराठ्यांना (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेणारच असा निर्धारही जारांगेंनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.