Gunratna Sadavarte News : विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. तेंव्हा त्यांनी आरक्षणापासून विविध मुद्यांवर आपले मत व्यक्त केले. राहुल गांधींच्या अमेरिकेच्या दौऱ्यात पाकव्याप्त काश्मिरला पाठींबा देणारी महिला देखील सहभागी झाल्याने अॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी राहुल गांधींच्या विरोधात मुंबईतील एन.एम.जोशी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
राहुल गांधी संविधानाच्या विरोधात बोलतो. देशाच्या आरक्षणाच्या विरोधात बोलतो, असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी राहुल गांधींवर टीका केली.
राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी,रेबर्न हाऊस येथे अमेरिकन काँग्रेसच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी इल्हान उमरही उपस्थित होत्या.इल्हान उमरही पाकव्याप्त काश्मिरला पाकिस्तानचा भाग मानते. त्यामुळे इल्हान उमरच्या भेटीनंतर राहुल गांधींवर टीका होते आहे.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, भारताच्या अविभाज्य भाग असलेल्या अखंड काश्मिर प्रश्नावर इल्हाना उमरला राहुल गांधी भेटतो. ती जैश ए मोहम्मद, लष्करे तोयबा अशा अतिरेकी संघटनांशी संबंधित आहे. ती पाकव्याप्त काश्मीर म्हणते. अतिरेकी संघटनांशी संबंध असलेल्या महिलेला राहुल गांधी परदेशात जाऊन भेटतो. त्या महिलेशी यांचे काय संबंध आहेत. तिच्याशी चर्चा करतो, देशाच्या हिताच्या विरोधात काय भाष्य करतो?
अमेरिकेच्या दौऱ्यात राहुल गांधींनी आरक्षणाबाबत भूमिका व्यक्त केली होती. त्यावर टीका करताना अमित शाह म्हणाले होते की, जो पर्यंत भाजप आहे तोपर्यंत आरक्षणाला कुणी हातही लावू शकत नाही. भाजप आहे तोपर्यंत देशाच्या एकात्मतेशी कुणीही खेळू शकत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.