Gyanesh Kumar Protest | Sanjay Raut Sarkkarnama
मुंबई

Shivsena UBT : हातात रडणारं बाळ अन् पोलीस व्हॅनच्या दरवाज्यात उभी आई..., 'तो' फोटो शेअर करत राज्यसभा खासदाराचा फडणवीस-मोदींवर हल्लाबोल

Gyanesh Kumar protest : मुंबईतील शिवाजी पार्कवर ज्ञानेक कुमार यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या अनेक आंदोलकाना उचलून पोलीस गाड्यांमध्ये नेण्यात आलं. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू असताना त्यांनी एका महिलेला आणि तिच्या बाळाला देखील पोलीस व्हॅनमध्ये जबरदस्ती घुसवण्याचा प्रयत्न केल्याचा एक फोटो व्हायरल होत आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 12 Oct : केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभर आंदोलन सुरू आहेत. सीजेपीने दिल्लीतील जंतरमंतरवरून कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाची हाक दिली आहे. तर मुंबईत देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू करण्यात आलं आहे.

शिवाजी पार्कवर ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे देखील उपस्थित होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी अनेकांची धरपकड केली.

अनेक आंदोलकाना उचलून पोलीस गाड्यांमध्ये नेण्यात आलं. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू असताना त्यांनी एका महिलेला आणि तिच्या बाळाला देखील पोलीस व्हॅनमध्ये जबरदस्ती घुसवण्याचा प्रयत्न केल्याचा एक फोटो ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शेअर केला आहे.

हा फोटो शेअर करत राऊतांनी महाराष्ट्राच्या गृहखात्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "राजू शिंदे यांच्या या छायाचित्राने महाराष्ट्राच्या गृहखात्याचे निर्दयी चेहरा उघड केला आहे. आई-बाळाची ती हाक, डोळ्यांतली भीती आणि पोलिसांचा तो पाशवी हात. हे फक्त छायाचित्र नाही, हे लोकशाहीच्या बिघडलेल्या आरोग्याचं निदान आहे.

हृदयद्रावक, चीड आणणारं आणि आयकॉनिक. जेव्हा शांततेत आवाज उठवणारे आदिवासी विद्यार्थी किंवा नागरिक फरफटत पोलिस बसवर चढवले जातात, तेव्हा गृहखात्याची “कायदा-सुव्यवस्था” ही निर्दयी आणी भावना शून्य बनते.

राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे हे दिसते, देवेंद्र फडणवीस, मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकलले आहे ते या चित्रातून दिसते. देशातील प्रत्येक वर्तमान पत्राने हे चित्र पाहिल्या पानावर प्रसिद्ध केले पाहिजे.", असं म्हणत राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT