Hand over Wafgaon fort to government; Otherwise, there will be agitation in front of Rayat's officeHand over Wafgaon fort to government; Otherwise, there will be agitation in front of Rayat's office
Hand over Wafgaon fort to government; Otherwise, there will be agitation in front of Rayat's officeHand over Wafgaon fort to government; Otherwise, there will be agitation in front of Rayat's office 
मुंबई

वाफगाव किल्ला शासनाच्या ताब्यात द्या; अन्यथा 'रयत' च्या कार्यालयासमोर आंदोलन करणार

सरकारनामा ब्यूरो

सातारा : वाफगाव (ता. खेड) येथील "श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ" असलेला ऐतिहासिक भुईकोट किल्ला ही वास्तु राज्य संरक्षित स्मारक म्हणुन घोषित व्हावे, यासाठी पुरातत्व विभागाकडे होळकर स्मारक संवर्धन समिती २०१८ पासून पाठपुरावा करत आहे. याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून  महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ असलेली ही वास्तु एक अप्रतिम पर्यटनस्थळ व्हावे. तसेच ही वास्तु रयत शिक्षण संस्थेकडुन हस्तांतरीत करुन घेऊन संरक्षित करावी. येत्या एक महिन्यात याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा समितीसह महाराष्ट्रातील हजारो समाजबांधवांना रयतच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडतील, असा इशारा होळकर स्मारक व संवर्धन समितीने निवेदनाव्दारे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व सचिवांना दिला आहे.  

समितीचे महासचिव भगवान जऱ्हाड यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या सदस्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा संपुर्ण जगभर आदर्शवादी ठरावी, अशा काही उदारमतवादी दृष्टीकोनातुन ही वास्तु राज्य शासनाच्या अधिपत्त्याखाली जाऊन ते संरक्षित स्मारक व्हावे, त्याची डागडुजी व्हावी, या वास्तुमध्ये "श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर" यांचा भव्य असा आश्वारुढ पुतळा उभारला जावा.

तसेच हे एक आदर्श पर्यटन केंद्र व्हावे, यासाठी स्मारक संवर्धन समिती शासनस्तरावर निधी मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. या वास्तुच्या संवर्धनाची संपूर्ण जबाबदारी समितीने घेतली आहे. रयत शिक्षण संस्थेने गेल्या वर्षी या वास्तुच्या डागडुजी संदर्भात पुरातत्व खात्यास पत्र पाठवून ही वास्तू रयत शिक्षण संस्थेच्या कब्जे, वहिवाटी मालकीहक्का अंतर्गत येत आहे. मालकी हक्कास बाधा येत नसेल तर डागडुजी करण्यास काही हरकत नाही, असे पत्राद्वारे कळवले होते. 

यावरून पुणे जिल्हा नियोजन मंडळाकडे स्मारक संवर्धन समितीने निधीची मागणी केली होती. या वास्तुच्या डागडुजीसाठीचा चार कोटींच्या निधीचा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे.तसेच कोणतेही संसद सदस्य वा विधिमंडळ सदस्य आम्ही अनेकदा मागणी करुनही या वास्तुसाठी निधी टाकु शकले नाहीत. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलशी चर्चा करुन या वास्तुचे हस्तांतरण राज्य शासनाकडे त्वरीत करावे. मागील महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही समितीने याबाबत निवेदन दिले आहे.

ही वास्तु रयत शिक्षण संस्थेकडुन हस्तांतरीत करुन घेऊन राज्य संरक्षित करावी ही मागणी केली आहे. या वास्तुत श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर विद्यालय १९५५ पासुन सुरु असुन ग्रामीण भागातील आदर्श विद्यार्थी घडविण्याचे आदर्श कार्य होत आहे. तेव्हा या विद्यालयाच्या कोणत्याही शैक्षणिक उपक्रमास बाधा न येता या वास्तुचे हस्तांतरण करणे योग्य राहील. त्यामुळे येत्या एक महिन्यात निर्णय घ्यावा. 

अन्यथा समितीसह महाराष्ट्रातील हजारो समाजबांधव रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडतील, असा इशारा होळकर स्मारक संवर्धन समितीने दिला आहे. या निवेदनावर समितीचे महासचिव भगवान जऱ्हाड, कार्याध्यक्ष, नवनाथ बुळे सरकार, मुख्य सल्लागार, डॉ अर्चना पाटील, बापुराव सोलणकर, मारुती जानकर, उपाध्यक्ष युवराज तिकोले यांच्या सह्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT