Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

राज ठाकरेंचा इशारा २४ तासांत खरा; मनसैनिकांनी लावली 'हनुमान चालीसा'

MNS | Raj Thackeray | : राज ठाकरेंनी कालच दिला होता इशारा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी काल गुढीपाडवा मेळाव्यात दिलेला इशारा मनसैनिकांनी २४ तासांत खरा करुन दाखवला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी आज लाऊड स्पीकरवर 'हनुमान चालीसा' लावत राज ठाकरेंच्या इशारा सत्यात उतरवला आहे. मुंबईमधील (Mumbai) चांदिवली विधानसभा मतदारसंघ संपर्क कार्यालयाच्या बाहेरील उंच झाडावर लाऊड स्पीकर लावत त्यावर पक्षाचे पदाधिकारी, आणि चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी हनुमान चालीसा इतर धार्मिक कार्यक्रम ऐकवण्यास सुरुवात केली आहे.

भानुशाली माध्यमांशी बोलताना म्हणाले, राज ठाकरे यांचा आदेश होता की रस्त्यावर हनुमान चालीसा आणि गायत्री मंत्र वाजवा. मी त्यांच्या आदेशाचे पालन केले असून पक्षाच्या शाखेवर लाऊड स्पीकर लावले आहे आणि त्यावर हनुमान चालीसा आणि गायत्री मंत्र सुरु आहे. या भागात मंदिर किंवा मश्जिद कुठे आहे, असा प्रश्न विचाराल असता ते म्हणाले, मी या गोष्टी बघितलेल्या नाहीत, मी केवळ राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन केले आहे. पोलिसांनी मध्यस्थी करुन सहकार्य करण्याची विनंती केली, त्यानंतर आता रोज सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास याठिकाणी लाऊड स्पीकर सुरु राहणार आहेत.

राज ठाकरे यांनी काय इशारा दिला होता?

काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, मात्र राज्यातील मश्जिदींवर लागलेले भोंगे उतरवावेच लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल, असे म्हटले होते.

राज ठाकरे म्हणाले, पोलिसांना विचारा, त्यांच्याकडे माहिती आहे, या झोपडपट्ट्यांमधील मदरशांमध्ये एकदा धाडी टाका, तुम्हाला काय काय गोष्टी हाताला लागतील ते कळेल. गरजच नाही आपल्याला पाकिस्तानची. कशाला हवा आहे पाकिस्तान? उद्या जर काही घडलं तर आतमध्ये आवरता आवरता आपल्याला नाकीनऊ येणार आहे, इतक्या गोष्टी आतमध्ये भरुन ठेवल्या आहेत. काय काय गोष्टी बाहेर येतील त्याने धडकी भरेल, पण आमचं लक्ष नाही. आम्हाला मत हवी आहेत.

आम्हीच त्या झोपडपट्ट्या वाढवतोय, आम्हीच मदरसे वाढवतोय. पण अनेक मश्जिदी अशा आहेत, जिथे आतमध्ये नेमके काय सुरु आहे हे समजत नाही. हे सगळे पाकिस्तानच्या प्रोत्साहानाने आलेली आणि आपल्या लोकांनी स्विकारलेली लोक आहेत. लोकप्रतिनीधींना याची चिंता नाही. माझा प्रार्थनेला विरोध नाही, पण मशिदीवरील लागलेले भोंगे खाली उतरवावेच लागतील. या सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. अन्यथा जिथे जिथे भोंगे लागतील तिथे दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT