Kranti redkar/Sameer Wankhede
Instagram/@Kranti Redkar
मुंबई : नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोचे (NBC) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा आज (१४ डिसेंबर) वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमिताने त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने (Kranti Redkar) सोशल मिडीयावर एक स्पेशल पोस्ट लिहीली आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडे यांना अनेक वादाला सामोरं जावं लागलं. या पोस्टमधून क्रांतीने समीर वानखेडे यांच्या कामांच कौतुक केलं आहे, तर त्यांचावर आरोप करणाऱ्यांना फटकारलं आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडेंही वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या कारवाईवर आणि त्यांच्या नोकरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आरोप केले होते. मात्र क्रांती समीर वानखेडेंच्या पाठीशी खंबीपणे उभी राहत तिने मंत्री मलिकांचे सर्व आरोप आणि दावे धुडकावून लावले होते. त्यानंतर आज समीर यांच्या वाढदिवसानिमित्त क्रांतीने पुन्हा सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
काय लिहिले आहे क्रांतीने आपल्या पोस्टमध्ये
''kranti_redkar #sameerwankhede यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी नेहमी तुझ्याबद्दल आणि तुझ्या शौर्याचे वर्णन करून खूप काही लिहीत असते. पण आज मला शब्दही कमी पडत आहेत. देशात अंमली पदार्थांच्या राक्षसाशी लढा देणे ही वेगळी गोष्ट आहे. परंतू तुला या मिशनपासून तुम्हाला रोखणाऱ्या सर्वांविरुद्ध लढा देणे हा देखील एक मोठ संघर्ष आहे, आणि ज्याचा तुम्ही दररोज सामना करत आहात. तुम्ही चांगले काम करत राहा, समाजाची स्वच्छता करा, तरुणांना योग्य मार्ग दाखवा, त्यांच्या भल्यासाठी काम करा. तुमच्यावर जनतेचा आशीर्वाद आहे. सामान्य माणूस खूप हुशार असतो. त्याला काय योग्य काय अयोग्य हे त्याला माहित असते. तुम्ही फक्त काम करत राहा, अखंडता कशी दिसते ते जगाला दाखवा. जे लोक खरोखर आपल्या समाजाची काळजी घेतात आणि आपल्या राष्ट्रावर प्रेम करतात, तुमच्यावर प्रेम करतात आणि तेच महत्त्वाचे आहे.''
दरम्यान, समीर वानखेडे यांनी २ ऑक्टोबर २०२१ रोजी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्ग्ज प्रकरणात अटक केली. मात्र त्यांच्या या कारवाईमुळे तेच लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकले. मंत्री नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप केले.
नबाव मलिकांनी ट्विटरवरुन समीर वानखेडेंचा जन्मदाखल्यापासून त्यांच्या पहिल्या लग्नाचे फोटो सोशल मिडीया आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून त्यांच्यावर अनेक आरोपही केले. तेव्हापासून समीर वानखेडें सातत्याने चर्चेत आहेत. दरम्यान दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्य मृत्यूनंतरही बॉलिवूडचं आणि ड्रग्स कनेक्शन समोर आलं होतं. तेव्हा समीर वानखेडेंनी अनेक कलाकारांवर कारवाई केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.