Hasan Mushrif Sarkarnama
मुंबई

Hasan Mushrif Sons Got Relief : हसन मुश्रीफांच्या मुलांना १ जूनपर्यंत दिलासा; कोर्टात काय झालं?

ED Action Against Mushrif : हसन मुश्रीफ यांची मनी लाँड्रींगप्रकरणी 'ईडी'ची कारवाई

सरकारनामा ब्यूरो

Hasan Mushrif And ED : राष्ट्रवादी काँग्रसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या तीनही मुलांना १ जून पर्यंत मुंबई सत्र न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. पुढील निर्णयापर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे मुश्रीफांच्या मुलांना १ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले आहे.

इडीने दाखल केलेल्या प्रकरणाविरोधात मुश्रीफांच्या मुलांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिन्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावरील पुढची सुनावणी १ जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. तो पर्यंत तिघांनाही अटकेपासून दिलेले संरक्षण कायम असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांची मनी लाँड्रींगप्रकरणी 'ईडी'ची कारवाई सुरू आहे. याच प्रकरणात त्यांच्या तीनही मुलांवर गुन्हा दाखल आहे. आमदार मुश्रीफांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, आज त्याच न्यायालयाने मुश्रीफांच्या तीनही मुलांना पुन्हा तात्पुरता दिलासा दिला आहे.

आमदार हसन मुश्रीफ यांच्यांवर मनी लाँड्रींगप्रकरणी 'ईडी'ने खटाला दाखल केला आहे. याच प्रकरणात साजीद, आवेद आणि नावेद या त्यांच्या मुलांचाही समावेश असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याविरोधात या मुश्रीफ पिता-पुत्रांनी जामीन अर्ज केला आहे.

दरम्यान, मुश्रीफांच्या तीन मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झालेली आहे. मात्र युक्तीवाद सुरू आहे. हा युक्तीवाद १२ एप्रिल रोजी होणार होता. त्यावेळी तो तहकूब करून त्यासाठी तारीख २० एप्रिल देण्यात आली. त्या दिवशीही युक्तीवाद झाला नाही. तो ४ मे रोजी होणार होता. मात्र ४ मे राजीही सत्र न्यायालयाने सुनावण तहकू केली. आता १ जून रोजी मुलांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. तोपर्यंत या तिघांनाही 'पीएमएलए' कोर्टाने अटकेपासून दिलेले संरक्षण या कोर्टानेही कायम ठेवले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT