Hasan Mushrif  sarkarnama
मुंबई

मुश्रीफांचा खळबळजनक दावा; मला चंद्रकांत पाटलांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती

Amol Jaybhaye

मुंबई : मी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा अभारी आहे. मला डेंग्यू झाला होता. भाजप आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचे हे षडयंत्र आहे. महाविकास आघाडी सरकारवर ते नियमीत आरोप करत आहेत. कोल्हापूर जिल्यात भाजप भूईसपाट झाला आहे. त्यामुळे पाटील सोमय्या यांच्या मार्फत आरोप करत आहेत, असा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केला. मुश्रीफ यांनी सोमय्यांच्या आरोपांना उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी हा खळबळजनक दावा केला. (Hasan Mushrif criticizes Chandrakant Patil)

मुश्रीफ म्हणाले, मला चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. कोल्हापूर जिल्हात भाजप झीरो झाली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना बदलायचे ठरले होते. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मैत्रीमुळे त्यांना बदलले नाही, असे मुश्रीफ यांनी सांगितले. सोमय्या म्हणाले, मी कागत काढतो आणि तो विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांकडे जातो. ते सांगतात त्या प्रणाणे मी काम करतो. चंद्रकांत पाटील यांनी व्यवस्थीत लढावे, असेही मुश्रीफ म्हणाले.

माझा दावा तयार होत आला आहे. आज आरोप केला तो बिनबुडाचा आणि खोटा आहे. मला त्यांच्या पदवीवरच शंका येते. त्यांनी अजूनही अभ्यास करावा मी त्यांच्याकडे सीए पाठतो. माझे भाजपमध्ये अनेक मित्र आहेत. त्यांनी सोमय्या यांना सांगितले होते की मुश्रीफ यांच्यावर आरोप करु नका. मात्र, त्यांनी ऐकले नाही.

अप्पासाहेब कारखान्याचा घोटाळा त्यांनी सांगितले आहे. त्या कारखान्याशसी माझा आणि माझ्या जवायचा कोणताही संबंध नाही. कंपन्या लहान असताना मोठा घोटाळा कसा होईल. तो कारखाना ब्रीक्स इंडिया कंपनीला राज्य सरकारने २०१२-१३ मध्ये चालवायला दिला होता. दोन वर्ष तोटा झाला म्हणून त्या कंपनीने कारखाना सोडला. ही शेल कंपनी नाही. ब्रीक्स इंडिया कंपनीला कोट्यांवधीचा तोटा झाला होता, असेही सोमय्या यांनी सांगितले. सोमय्या यांनी नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन घ्यायला हवे होते, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे.

मी सगळ्या आरोपांना उत्तर दिले आहे. तुम्ही ईडी आणि सीबीआयकडे पुरावे दिले आहेत. तर त्या संस्था चौकशी करतील. तुम्ही पर्यटन करायला कशाला जाता, असा सवाल मुश्रीफ यांनी केला. आमच्या काळात भाजप सारखे घोटाळे झाले नाहीत. शरद पवार यांचे नाव घेण्याची लायकी नाही त्यांचा यामध्ये काय सबंध आहे, मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांचे नाव घेत आहेत. त्यांचा काहीही संबंध नाही, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT