Sameer Wankhede, Kranti Redkar sarkarnama
मुंबई

क्रांती आणि समीर वानखेडेंच बर्थडे सेलिब्रेशन तुम्ही पाहिलतं का?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सोमवारी (१४ डिसेंबर) गणपती बाप्पाची आरती करुन आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) देखील त्यांच्या सोबत होती. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेले समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यासाठी स्थानिकांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. गणपती बाप्पाची आरती केल्यानंतर समीर वानखेडे आणि क्रांती यांनी केक कापला आणि त्यानंतर दोघांनी परिसरातील गरिबांना ब्लॅंकेटचे वाटप केले.

यावेळी नवीन वर्षांच्या आगमनापूर्वी एनसीबीने शहरातील अनेक ठिकाणी छापे टाकल्याची माहिती समीर वानखेडे यांनी दिली. नाताळ आणि नवीन वर्षाच्या उत्सवाच्या पार्श्वभुमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांत मुंबई NCB पथकाने संपूर्ण शहरात आठ कारवाया केल्या, त्यात नंतर सहा गुन्हे दाखल करण्यात आले. एनसीबी मुंबईने मुंबईतील ड्रग्ज पुरवठादार आणि पेडलर्सच्या विरोधात विविध ठिकाणी छापेमारी करत आतापर्यंत एकूण 2.296 किलो अॅम्फेटामाइन, 3.906 किलो अफू आणि 2.525 किलोग्राम जप्त केला असल्याचे समीर वानखेडे यांनी सांगितले.

दरम्यान, आर्यन खान प्रकरणानंतर मंत्री नबाव मलिक यांच्याकडून झालेल्या आरोपांमुळे समीर वानखेडे आणि त्यांचे कुटूंब आधीच त्रस्त झाले होते. त्यात सोशल मिडीयावर होणाऱ्या सातत्याने होणाऱ्या बदनामी मुळेसमीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर यांनी मुंबई शहर दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती. सोशल मिडीयावर त्यांच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध बदनामीकारक मजकूर होस्ट करण्यास मनाई करण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली होती.

"गुन्हेगारीची पार्श्वभूमी नसताना माझी बदनामी झाली आहे, असे मी म्हणतो. पण माझ्या प्रामाणिकतेच्या बळावरच मी माझ्या विभागात या पदापर्यंत पोहचलो आहे. माझ्या हस्तक्षेपाच्या स्वभावामुळे आणि मुंबईत मिळालेल्या पोस्टिंगमुळे माझे बहुतेक गुन्हेगार हे एकतर राजकारणाशी किंवा चित्रपट उद्योगाशी संबंधित आहेत. त्यामुळे माझ्या विरोधात काम करणाऱ्या शक्तींचा स्थानिक अधिकारी आणि सोशल मीडिया चॅनेल वाल्यांशी चांगला संबंध असल्यामुळे ते माझी बदनामा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT