He tried to commit suicide by banging his head on a police inspector's desk
He tried to commit suicide by banging his head on a police inspector's desk 
मुंबई

पोलिस निरिक्षकांच्या टेबलावर डोके आपटून त्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

सरकारनामा ब्यूरो

वाई : मारामारीसारख्या गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने वाई शहरात येण्यास मनाई करून जामीन दिलेला असताना एक संशयित आरोपी शहरात आला होता. त्याला पकडून चौकशीकामी पोलिस ठाण्यात आणले असता त्याने पोलिस निरीक्षकांच्या टेबलवर डोके आपटून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सागर भाऊराव मेश्राम (रा. गंगापुरी, वाई) असे सदर संशयित आरोपीचे नाव आहे.

 एक महिन्यापूर्वी वाई पोलिसांनी सागरला पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. जिल्हा सत्र न्यायालयाने वाई शहरात येण्यास बंदी घालत मनाई आदेश करून त्याचा जामीन मंजूर केलेला होता. मात्र, तो वाईमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिस ठाण्याचे गुन्हे अन्वेषणचे श्रावण राठोड व होमगार्ड प्रणित येवले यांना गस्त घालत असताना दुपारी गंगापुरी येथे सागर फिरताना आढळून आला. त्यावर त्यांनी विचारले असता तो त्यांच्यावरच दादागिरी करू लागला. तुम्हाला काय कराचेय, कोर्ट व मी बघून घेईन,' असे म्हणाला. त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात आणले.

पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या कक्षामध्ये त्यास विचारपूस करण्यास हजर केले असता, त्याने गोंधळ घालत स्वतःचे डोके टेबलावर आपटले. त्याने अचानक घेतलेल्या पवित्र्याने सगळ्यांची पळापळ झाली. तेथेच असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे तपास करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT