He would have sold the district to Baramatikar: Mahesh Shinde's attack on Shashikant Shide 
मुंबई

तर त्यांनी जिल्हा बारामतीकरांना विकला असता : महेश शिंदेंचा शशीकांत शिदेंवर घणाघात

मी आमदार झाल्यानंतर कोरेगाव मतदारसंघात झालेला बदल त्यांना दिसत नाही. त्यामुळे ते आता शुद्धीत नाहीत.

अतुल वाघ

वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) : शशीकांत शिंदे भाषणात सातत्याने म्हणतात, मला निवडून दिलं नसल्याने कोरेगाव तालुक्याच मोठं नुकसान झालंय. 2013-14 ला यांना मंत्री पद दिलं. त्यावेळी उरमोडीतील पाणी सांगलीत गेलं. मात्र, मतदारसंघातील गुंठाभर जमीन भिजली नाही. आता पुन्हा मंत्री झालं असते तर जिल्हा बारामतीकरांना विकला असता. त्यामुळे जे झालं त्यात जिल्हा खुश झाला, असा टोला कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी पिंपोडे खुर्द येथील जाहीर सभेत लगावला आहे. He would have sold the district to Baramatikar: Mahesh Shinde's attack on Shashikant Shide

पिंपोडे खुर्द (ता. कोरेगाव) येथील पाणी पुरवठा योजना तसेच 82 लाखांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी राहुल कदम, जिल्हा नियोजन सदस्य राहुल बर्गे, भाजप तालुकाध्यक्ष संतोष जाधव, पोपट भोज, विलास पवार, अमर पवार, चंद्रकांत पवार, शिवाजी कदम, दिनकर कदम, तानाजी गोळे, रत्नदीप फाळके, सातरारोडचे सरपंच किशोर फाळके उपस्थित होते.

महेश शिंदे म्हणाले, कोरेगाव मतदारसंघात मागील दहा वर्षांत येथील माजी आमदाराने खोटं बोल पण रेटून बोल, अशी भूमिका घेत केवळ नारळ फोडण्याचा उद्योग केला. या नारळानेच त्यांना घरचा रस्ता दाखवला तरीही हे महाशय अजूनही नारळ फोडत आहेत. मी शिवसेनाचा आमदार आहे, याचं भान ठेवा. त्यामुळे माझ्यावर बोलताना विचार करून बोला आणि माझ्या नादाला लागू नका, नाहीतर आता थोडक्यात पडलायं. पुढच्या वेळी डिपॉझिट पण ठेवणार नाही, असा इशारा आमदार महेश शिंदे यांनी दिला.

आमदार शिंदे म्हणाले, मी जातिवंत शेतकरी आहे. आम्ही डोंगरात भात पिकवत नाही. आम्ही पायऱ्याने शेती करतो. जोपर्यंत आमच्या पायऱ्यातील शेवटच्या शेतकऱ्यांची मळणी होत नाही, तो पर्यंत आम्ही पायऱ्या सोडत नाही. पायऱ्या सोडण्याची आमची नाही तर, ती तुमची औलाद आहे, असा टोला त्यांनी यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांना लगावला. आठवड्यापूर्वी याच स्टेजवर त्यांची सभा झाली. त्यावेळी मी कोणत्या पक्षात आहे, ते समजत नाही असा प्रश्न त्यांनी केला होता. खरंतर यावेळी या स्टेजवर बसलेली लोक शुद्धीत नव्हते.

मी आमदार झाल्यानंतर कोरेगाव मतदारसंघात झालेला बदल त्यांना दिसत नाही. त्यामुळे ते आता शुद्धीत नाहीत. ते त्यांच्या भाषणात सतत बोलतात मला निवडून दिलं नसल्याने कोरेगाव तालुक्याच मोठं नुकसान झालं. 2013-14 ला यांना मंत्री पद दिलं. त्यावेळी उरमोडीतील पाणी सांगलीत गेलं. मात्र, मतदारसंघातील गुंठाभर जमीन भिजली नाही. आता पुन्हा मंत्री झालं असते तर जिल्हा बारामतीकरांना विकला असता. त्यामुळे जे झालं त्यात जिल्हा खुश झाला, असा टोला ही त्यांनी लगावला.

केवळ खोट बोलण्यात माहिर असलेल्या माजी आमदार शशीकांत शिंदेनी कोरोना काळात 10 वर्षांपासून त्यांना साथ देणाऱ्या जनतेला वाऱ्यावर सोडून मुंबईला पळ काढला. यावेळी मी आणि माझे कार्यकर्ते या लढाईत झोकून घेत येथील जनतेसाठी कोविड हॉस्पिटलची उभारणी केली आणि पहिल्या लाटेत 1400 रुग्णांना जीवदान दिले. आजही हे काम सुरू आहे. आपण काय केलं आपण 300 बेडच कोरोना हॉस्पिटल कुठं उभारलं त्याचा शोध अजून लागला नाही. यावेळी राहुल कदम, श्रीपाद कदम, जितेंद्र कदम, नामदेव कदम यांचे मनोगत झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT