Chhagan Bhujbal-Tanaji Sawant
Chhagan Bhujbal-Tanaji Sawant Sarkarnama
मुंबई

छगन भुजबळांच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी हात जोडले!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : डासांचे वर्गीकरण करताना किती डास पकडले. त्याचे विच्छेदन केल्यानंतर त्यात नर आणि मादी डास किती आढळले? विच्छेदनातून अतिशय संहारक हे मादी डास आहेत की नर डास? त्या व्हिसेराचा आपल्याकडे अहवाल आला आहे का?, अशा पेचात टाकणाऱ्या प्रश्नांचे बाण राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सोडत आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना घेरण्याचा प्रयत्न केला. भुजबळांच्या या प्रश्नांच्या बाणाने घायाळ झालेल्या सावंतांनी उत्तर देताना हात जोडले. (Health Minister Tanaji Sawant joined hands on Chhagan Bhujbal's question)

पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगचा वाढलेला प्रादुर्भाव पाहता सरकारने काय उपाय योजना केल्या आहेत? या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सरकारने निवडक भागातील डास पकडून त्याचे वर्गीकरण केले आहे. त्यांचे विच्छेदन करून डासांची घनता काढली आहे, असे उत्तर दिले होते. त्यानंतर भुजबळ यांनी डासांसदर्भात विविध प्रश्न विचारले.

डास पकडून त्यांचे वर्गीकरण करण्याचे काम चांगले आहे. पण वर्गीकरणासाठी किती डास पकडले. त्यात नर किती आणि मादी किती. त्यातही संहारक मादी जास्त की नर डास जास्त आहे, असे मिश्किल प्रश्न करत भुजबळ यांनी सावंत यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. भुजबळ यांच्या या मिश्किल प्रश्नांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही टिप्पणी केली. ते म्हणाले की, भुजबळसाहेब, या प्रश्नावंर संशोधन करण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल.’

भुजबळ यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी उठलेले आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले की, असे डास पकडलेले आहेत. त्याची माहिती घेऊन मी पटलावर ठेवतो, असे म्हणून भुजबळांकडे पाहत दोन्ही हात जोडून नमस्कार केला.

दरम्यान, अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालघरच्या प्रश्नावर आरोग्य मंत्री सावंत यांना धारेवर धरले होते. पुरेशा माहितीअभावी त्यांना अनेक प्रश्नांवर उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे अनेक प्रश्नांना उत्तरे देताना माहिती घेऊन देतो, अशी उत्तर दिले. पालघरचा प्रश्न शेवटी राखून ठेवावा लागला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT