Rajesh Tope sarkarnama
मुंबई

निर्बंध वाढण्याचे आरोग्य मंत्र्यांचे संकेत; महामारीतून लसच वाचवेल

राज्यात कुठेही रूग्णालयात Patients Increased भरती होण्याचे प्रमाण व ऑक्सिजन Oxygen वापराचे प्रमाणही वाढलेले नाही. त्यामुळे जनतेने घाबरण्याचे काहीही कारण नाही, असेही मंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांत कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. अनावश्यक गोष्टींमुळे संसर्ग वाढत आहे. त्यामुळे आगामी कालावधीत निर्बंध वाढण्याचा विचार होऊ शकतो. पण, नागरीकांनी घाबरून न जाता लसीकरणावर भर द्यावा. ही लसच आपली तारणहार आहे, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या अनुषंगाने राज्यात निर्बंध वाढण्याची शक्यता आहे. याविषयी पत्रकारांनी आरोग्य मंत्री टोपे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राजे टोपे म्हणाले, राज्यात कोरोनाचे निर्बंध लावण्याबाबत विविध प्रस्ताव आलेले आहेत. या प्रस्तावांवर चर्चा होत असते. याबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्री घेत असतात. असे काही प्रस्ताव असु शकतात. त्या प्रस्तावांना मान्यता मिळणे गरजेचे आहे.

मुंबईंत रूग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त करून श्री. टोपे यांनी आगामी काळात निर्बंध येण्याची शक्यता वर्तवली. ते म्हणाले, राज्यात कुठेही रूग्णालयात भरती होण्याचे प्रमाण व ऑक्सिजन वापराचे प्रमाणही वाढलेले नाही. त्यामुळे जनतेने घाबरण्याचे काहीही कारण नाही. कोरोनासून ही लसच आपल्याला वाचवू शकते. लसीकरणाच्या संदर्भात चुकीच्या घटना किंवा कायद्याला धरून जे होत नाहीत. अशा टोळीला पकडून त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल. आता आपण लसीकरणावर जोर देत असून येत्या दहा तारखेपासून ६० वर्षावरील नागरीकांना बुस्टर डोस दिला जाणार आहे.

हा डोस तसेच १५ ते १८ वयोगटातील युवकांनी देखील लसीकरण करून घ्यावे. कारण ही लसच आपली तारणहार होणार आहे. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करू घ्यावे. येत्या काळात आम्ही ज्यांचा दुसरा डोस घेण्याची वेळ आलेली आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांना लस देणार आहोत. आरोग्य विभाग म्हणून आम्ही आमचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडणार आहे. या कामाला जनतेने सहकार्य करावे, अशी विनंती श्री. टोपे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT