Bhagatsingh koshyari| Mumbai High Court
Bhagatsingh koshyari| Mumbai High Court Sarkarnama
मुंबई

Bhagatsingh koshyari news: महापुरुषांचा अवमान प्रकरणी उच्च न्यायालयाचा कोश्यारींना दिलासा

सरकारनामा ब्युरो

High Court- Bhagatsingh Koshyari news : मुंबई उच्च न्यायालयाने माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मोठा दिलासा दिला आहे. भगतसिंह कोश्यारी यांचा महापुरुषांचा अनादर करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असी टिप्पणी करत न्यायालयाने त्यांच्या विरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. पण न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (High Court gives relief to Koshyaris in the case of contempt of great men)

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच वादात अडकलेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका नुकतीच फेटाळून लावली आहे.

समाजाचं प्रबोधन करणं हा भगतसिंह कोश्यारी यांचा हेतू होता. त्यांना कोणत्याही महान व्यक्तीचा अनादर करायचा नव्हता. असं निरीक्षण न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अभय वाघवासे यांच्या खंडपीठानं नमूद केलं आहे.

तसेच, राज्यपालांची वक्तव्य ही इतिहासाच्या विश्लेषणात्मक आहेत.त्या वक्तव्यामधून राज्यपालांचा सामाजिक दृष्टीकोन दिसून येतो. श्रोत्यांनीही समाजाभीमूख दृष्टीकोन आत्मसात करत तो आचरणातही आणावा हाच त्या वक्तव्यांमागचा उद्देश होता, असंही न्यायालयाने नमुद केलंआहे.

प्रथमदर्शनी त्यांची ही वक्तव्ये कोणत्याही महापुरुषांचा अवमान करणारी नाहीत. म्हणूनच ही फौजदारी गुन्हा कायद्यानुसार दखल घेण्यासाठी पात्र ठरत नाहीत, असंही न्यायालयाने आपल्या आदेशात नोंदवलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT