Ganesh Naik Latest News
Ganesh Naik Latest News Sarkarnama
मुंबई

गणेश नाईकांना उच्च न्यायालयाचा दिलासा पण पोलिसांकडे रिव्हॉल्वर जमा करावे लागणार

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भाजपा (BJP) नेते आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांना लैंगिक अत्याचार व धमकीप्रकरणी उच्च न्यायालयाकडून (High Court) अटकेपासून दिलासा मिळाला आहे. नाईक यांचा उच्च न्यायालयाने अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे. दोन्ही गुन्ह्यांमध्ये अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ठाणे सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन नाकारल्यावर नाईकांनी उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. (Ganesh Naik Latest News)

दोघांमधील संबंध हे संमतीने असून ते १९९३ पासून नातेसंबंधात होते. त्याला सकृतदर्शीनी बलात्कार म्हणता येणार नाही, असे नमूद करत न्यायलयाने नाईकांना दिलासा दिला आहे. अटक झाल्यास वैयक्तिक बंधपत्रावर सुटकेचे आदेशही दिले असून पोलिसांकडे (Mumbai Police) रिव्हॉल्वर जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नाईकांविरोधात एका महिलेने लैंगिक अत्याचार आणि धमकी प्रकरणी तक्रार दाखल केली होती. धमकी प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलिस ठाण्यात तर लैंगिक अत्याचाराबद्द्ल नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीमध्ये महिलेने म्हटले की, नाईक हे माझ्याबरोबर गेल्या २७ वर्षांपासून लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशिपमध्ये असून त्यांच्यापासून एक मुलगाही असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे या मुलाला वडील म्हणून नाईकांनी नाव द्यावे यासाठी संबंधित महिलेने नाईक यांच्याकडे मागणी केली असल्याचा दावाही या तक्रारदार महिलेने केला होता.

दरम्यान, नाईकांनी मार्च २०२१ तक्रारदार महिलेला बेलापूरातील सेक्टर १५ मधील आपल्या कार्यालयात बोलावून घेतले होते. मात्र, त्याठिकाणीही या महिलेने हीच मागणी केल्याने यावेळी नाईकांनी या महिलेवर रिव्हॉल्व्हर रोखून तू जास्त बोलू नको. तू काय करणार? मला त्रास देऊ नका नाहीतर मी स्वत:ला आणि तुम्हाला सुद्धा संपवेल, अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे, तक्रारदार महिलेने तक्रारीत नमूद केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT