Sachin Waze
Sachin Waze Sarkarnama
मुंबई

उच्च न्यायालयात धाव घेऊन सचिन वाझे आला अडचणीत

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबई पोलीस दलातील बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) याला उच्च न्यायालयाने (High Court) आज चांगलेच फटकारले. याचबरोबर माहिती लपवल्याप्रकरणी सचिन वाझेच्या वकिलांनाही न्यायालयानं तंबी दिली आहे. उच्च न्यायालयात धाव घेणे वाझेला महागात पडल्याचे चित्र आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गौतम पटेल आणि न्यायाधीश माधव जामदार यांच्या खंडपीठाने हे ताशेरे ओढले आहेत.

चांदिवाल समितीच्या विरोधात वाझेने उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने वाझेला तंबी दिली. याचिका बिनशर्त मागे घ्या, अन्यथा कठोरपणे ती फेटाळून लावू, अशा शब्दांत न्यायालयाने वाझेंना इशारा दिला आहे. या प्रकरणी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत निर्णय कळवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. चांदिवाल समितीसमोर केलेले अर्ज फेटाळण्यात आले होते. या विरोधात वाझेने उच्च न्यालयात धाव घेतली होती.

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने समितीची स्थापना केली आहे. निवृत्त न्यायाधीश कैलास चांदिवाल यांच्या नेतृत्वाखाली ही समिती देशमुखांवरील आरोपांची चौकशी करीत आहे. नंतर या समितीला दिवाणी न्यायालयाचे अधिकार देण्यात आले होते.

उच्च न्यायालयात चांदिवाल समितीच्या कामकाजाच्या विरोधात दाखल केलेली याचिका बिनशर्त मागे घ्या, अन्यथा कठोरपणे ती फेटाळून लावू, अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाने सचिन वाझेला दिली आहे. वाझे याने समितीला दिलेले चार अर्ज फेटाळण्यात आले होते. या विरोधात वाझे याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यात योग्य माहिती लपवल्याप्रकरणी खंडपीठाने वाझे याच्या वकिलांनाही फैलावर घेतले.

रियाज काझींचा जामीन फेटाळला

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया स्फोटकेप्रकरणी (Anitilia Case) अटकेत असलेले माजी पोलीस अधिकारी रियाज काजी यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. काजी हे सचिन वाझेचे निकटवर्ती आहेत. त्यांना राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT