Uddhav Thackeray and Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Shinde Government News : महाराष्ट्रात सर्वाधिक उद्योग 'या' सरकारच्या कार्यकाळात ; गुजरात, उत्तरप्रदेशालाही मागे टाकले..

Shinde Government News : देशात उद्योगप्रधान राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे, त्यामुळे अनेक उद्योजकांना महाराष्ट्राचे आकर्षण आहे.

सरकारनामा ब्युरो

Shinde Government News : शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Government) सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रात येणारे प्रकल्प अन्य राज्यात जात आहेत, असा आरोप विरोधक करीत आहेत. (Shinde Government news update)

यावर शिंदे-ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोप होत असतात. काही कागदपत्रे दाखवून शिंदे सरकारमुळे प्रकल्प अन्य राज्यात गेल्याचा दावा महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे, तर हा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खोडून काढला आहे.

गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातसह इतर राज्यांत पळवले जात असल्याच्या आरोपांवरून राजकीय वादंग सुरू आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाईस पार्कनंतर आता ऊर्जा उपकरण निर्मितीचा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून गेला, असे सांगितले जात आहे. यामुळे भाजप-शिंदे सरकारवर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. "प्रकल्प महाराष्ट्रातून जात आहेत, अशी नकारात्मकता पसरवणं अतिशय चुकीचं आहे, त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होते," असे फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दौरा नुकताच झाला. या दौऱ्यात त्यांनी मुंबईतील काही उद्योगपतींशी चर्चा केली. उत्तरप्रदेशात गुंतवणुक करण्याचे आवाहन त्यांनी उद्योगपतींना केले आहे.

उद्योजकांना महाराष्ट्राचे आकर्षण

उत्तरप्रदेशात गुंतवणूक करण्यासाठी येथे पायाभूत सुविधा, उद्योगांना अनुकूल वातावरण आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. महाराष्ट्रात उद्योगांसाठी अनुकूल असलेल्या वातावरणामुळेच योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना उद्योगपतींना आमंत्रित करण्यासाठी मुंबईत यावे लागले आहे.देशात उद्योगप्रधान राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे, त्यामुळे अनेक उद्योजकांना महाराष्ट्राचे आकर्षण आहे.

गुजरात तिसऱ्या क्रमांकावर

या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात व अन्य राज्यात किती उद्योग आले, हे जाणून घेऊया.जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत महाराष्ट्रात एकूण २६,६८४ नवीन कंपन्या स्थापन झाल्याचे आकडेवारी सांगते. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशमध्ये १४,९५८, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये ७,९६६ नवीन कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये स्थापन झालेल्या कंपन्यांची संख्या एकत्र केली तरी महाराष्ट्रात स्थापन झालेल्या कंपन्यांची संख्या अधिक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT