Sachin Sawant
Sachin Sawant sarkarnama
मुंबई

'जय श्रीराम' बोलून मुलींचा छळ ; हा द्वेष तुमच्या घरात चालेल का? कॉग्रेसचा सवाल

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ''कर्नाटकातील एका कॉलेजातून सुरू झालेला हिजाबबाबतचा (hijab)वाद अद्याप थांबलेला नाही. या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी सुरू आहे.''जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक पोषाखांवर बंदी राहील,'' असा अंतरिम आदेश हायकोर्टानं दिला आहे. पण हिजाबचा हा वाद कॉलेजमधून राजकारणातही सुरु झाला आहे. काही पक्षानी हिजाबचे समर्थन केलं आहे,तर काहींनी विरोध.

कॉग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant)यांनी याबाबत टि्वट करीत भाजपवर (BJP)टीका केली आहे. ''भाजपा भारतीय राजकारणाला लागलेली वाळवी आहे. या देशात पराकोटीचा द्वेष, अशी गलिच्छ भाषा, धर्मांधता पसरवत आहेत. पालकांनो, ही भाषा आपली मुले शिकत आहेत. हातात पुस्तकांऐवजी दगड येत आहेत, तोंडांत पाढ्यांऐवजी जय श्रीराम बोलून मुलींना छळत आहेत. हा द्वेष तुमच्या घरात तुम्हाला चालेल का? असा सवाल सचिन सावतं यांनी विचारला आहे.

शिक्षण संस्थांमध्ये समान वेश अनिवार्य करण्याच्या कर्नाटक सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न काही विद्यार्थ्यांनी केल्यामुळे राज्यातील ‘हिजाब’बाबतचा वाद गेल्या सोमवारी चिघळला. उडुपी जिल्ह्यातील कुंदापूरमधील एका महाविद्यालयात हिजाब घालून आलेल्या मुलींशी प्राचार्यानी चर्चा केली आणि त्यांना सरकारचा आदेश समजावून सांगितला. मात्र विद्यार्थिनींनी हिजाब घालण्याचा हट्ट धरल्याने त्यांना त्यांच्यासाठी व्यवस्था केलेल्या एका वेगळय़ा खोलीत बसण्यास सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांचा एक गट याच दिवशी भगव्या शाली घालून मिरवणुकीने आला. त्यांच्या प्राचार्यानी व तेथील पोलिसांनी त्यांना महाविद्यालयाच्या परिसरात येण्यापासून रोखले. हिजाब घातलेल्या मुलींना वर्गात बसण्याची मुभा देण्यात आली, तर आम्ही या शाली घालू असे त्यांनी सांगितले. हिजाब घातलेल्या कुणालाही परवानगी दिली जाणार नाही असे आश्वासन प्राचार्यानी त्यांना दिल्यानंतर त्यांनी शाली काढून वर्गात जाण्याचे मान्य केले.

मांड्या येथील कॉलेजमध्ये मुस्कान खान हिने हिजाब परिधान केला होता यावरुन वाद झाला. काही विद्यार्थ्यांनी तिला पाहून ''जय श्रीराम''च्या घोषणा दिल्या होत्या. यानंतर मुस्कानने 'अल्लाह हो अकबर'चा नारा दिला होता. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हापासून मुस्कान ही चर्चेत आहे. या वादानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करणार असल्याचे मुस्कानने कॉलेज प्रशासनाला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT