Hindustani Bhau Marathi News Updates sarkarnama
मुंबई

विद्यार्थ्यांना पुन्हा भडकवणारी क्लिप व्हायरल; भाऊच्या वकिलांनीच केला मोठा खुलासा

दहावी-बारावीची परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीसाठी सोमवारी (३१ जानेवारी) राज्याच्या विविध शहरात हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : दहावी-बारावीची परीक्षा (SSC Exam) ऑनलाईन घेण्याच्या मागणीसाठी सोमवारी (३१ जानेवारी) राज्याच्या विविध शहरात हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या प्रकरणामध्ये हिंदुस्तानी भाऊला चार फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर हिंदुस्थानी भाऊसाठी विद्यार्थ्यांना भडकवणारी क्लिप पुन्हा सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. बुधवारी (ता. 2) धारावी पोलीस (Police) ठाण्याबाहेर जमा होण्याचे आवाहन या क्लिपमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Hindustani Bhau News Updates)

सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau) उर्फ विकास पाठकने या विद्यार्थांना दिलेल्या चिथावणीमुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी विद्यार्थ्यांची माथी भडकावणाऱ्या या हिंदुस्थानी भाऊला अटक करुन मंगळवारी न्यायलयासमोर हजर केले. विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊ आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला. हिंदुस्थानी भाऊने आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आंदोलनास प्रवृत्त केले होते. याच गुन्ह्याखाली त्याला मंगळवारी सकाळी धारावी पोलिसांनी अटक केली.

या कारवाईनंतर आता विद्यार्थ्यांसाठी भाऊंना अटक झाली, आता आपण विद्यार्थ्यांनी पुढे येऊन त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. अशा परिस्थितीत आज दुपारी 12 वाजता धारावी पोलीस ठाण्याबाहेर विद्यार्थ्यांनी जमा होण्याचे आवाहन करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यावर हिंदुस्थानी भाऊच्या वतीने त्यांचे वकील अशोक मुळे (Ashok Muley) यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये त्यांनी भाऊंनी असं कोणतंही आवाहन केलं नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हिंदुस्थानी भाऊंशी याबाबत बोलणे झाले आहे. त्यांनी सांगितले आहे की, काही समाजविघातक लोक आपल्या नावाने विद्यार्थ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण विद्यार्थ्यांनी असं काही करू नये. मी जोपर्यंत बाहेर येत नाही, मी व्हिडीओच्या माध्यमातून काही बोलत नाही, तोपर्यंत कशावरही विश्वास ठेवू नका. काही लोक पोलीस व यंत्रणेला त्रास देण्यासाठी हे करत आहेत, असे भाऊंनी सांगितल्याचे मुळे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात येतील, असे राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी जाहीर केल्यानंतर या निर्णयाला विरोध होऊ लागला. हिंदुस्थानी भाऊनेही शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयाला विरोध केला. तसेच राज्यभरातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवा, अशी चिथावणी त्याने विद्यार्थ्यांना दिली होती. मी सोमवारी धारावीत जाऊन वर्षां गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलन करेन, असेही त्याने जाहीर केले होते. रविवारी इस्टाग्रामवर संदेश पाठवून राज्यातील विविध शहरांमध्ये कधी आणि कुठे आंदोलन करायचे, याची माहिती प्रसारित केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT