Hindusthani Bhau sarkarnama
मुंबई

`हिंदुस्थानी भाऊ`नेच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पेटविले : पोलिस आवळणार मुसक्या

परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले..

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मुंबईतील धारावीपासून ते नागपूरपर्यंत दुपारी अचानक दहावी-बारावीचे (SSC Exam) विद्यार्थी रस्त्यावर आले आणि परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करू लागल्याने अनेकांना आश्चर्य़ वाटले. कोणत्याही राजकीय पक्षाने आंदोलनाचा इशारा दिलेला नव्हता, विद्यार्थी संघटनांच्या लेखी हा विषय नव्हता. तरीही महाराष्ट्रात सर्वत्र हे विद्यार्थी लेखी परीक्षा रद्द करून ऑनलाईन परीक्षेसाठी आक्रमक का झाले, याचा उलगडा होत नव्हता. अखेरीस `हिंदुस्थानी भाई` (Hindusthani Bhau) या पाठीमागे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विकास पाठक तथा हिंदुस्थानी भाई (Hindusthani Bhau) म्हणून हे पात्र सोशल मिडियात प्रसिद्ध आहे. त्याने 26 जानेवारी रोजी यासाठीचा व्हिडीओ जारी करून 31 जानेवारी रोजी आंदोलनासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले होते. या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय असल्याचे मत त्याने व्यक्त केले होते. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या अन्याय्य धोरणाच्या विरोधात सर्वांनी एकत्रित यावे. त्यासाठी मला माझ्या जिवाची पर्वा नाही. या परीक्षा रद्द कराव्यात म्हमून मी वर्षा गायकवाड यांना निवेदन दिले आहे. या परीक्षा मी रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आवाहन त्याने केले होते.

त्याच्या या आवाहनानंतर महाराष्ट्रभर दहावीचे विद्यार्थी आंदोलनासाठी आले. धारावीत त्यांच्यावर लाठीमार करावा लागला. नागूपर, औरंगाबाद, लातूर येथे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. एके ठिकाणी बस जाळण्याचा प्रयत्न झाला. धारावीत लाठीमार झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

या प्रकारामागे कोण आहेत, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. काॅंग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनीही विद्यार्थ्यांच्या आडून कोण आंदोलन करत आहे, याचा शोध घेण्याची मागणी केली. मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण राजकारण करत आहे? ही विद्यार्थ्यांची संघटना नाही. कोणी मागणी केली नव्हती. मग हे विद्यार्थी एवढ्या संख्येने कसे येतात? सोशल मीडिया माध्यमातून कोण भडकवत आहे याचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी वाघमारे यांनी केली. शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही हिंदुस्थानी भाईचा पोलिस शोध घेत असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT