Hitendra Thakur becomes active again in Vasai-Virar, reviving Bahujan Vikas Aaghadi’s political clash with BJP. sarkarnama
मुंबई

Hitendra Thakur Politics : 'मी पुन्हा येणार, घासून नाही ठासून', बॅनर पाहून हितेंद्र ठाकूरांचे स्मितहस्य अन् सूचक संदेश!

Vasai-Virar BJP Vs BVS : हितेंद्र ठाकूर यांचा विधानसभेला पराभव झाला. या पराभवानंतर आगामी महापालिकेसाठी आपण पुन्हा मैदानात उतरण्यास सज्ज असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

संदीप पंडित

Vasai-Virar Politics : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांना अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर बहुजन विकास आघाडी अद्याप सावरू शकलेली नाही. पक्षांतर्गत मतभेद वाढलेले असून अनेक कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत. काही जण पक्षांतराच्याही मार्गावर आहेत. अशा स्थितीत कार्यकर्त्यांना पक्षाची स्पष्ट दिशा मिळत नाही.

हितेंद्र ठाकूर यांनी देखील अजून अघडपणे विरोधकांना अंगावर घेतलेले नाही. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'मी पुन्हा येणार, घासून नाही; तर ठासून येणार', असे फलक हितेंद्र ठाकूरांच्या फोटोसह गोविंदा पथकाने झळकवले ते पाहून ठाकूर यांनी स्मितहस्य केले.

गोविंदांनी दिलेला "मी पुन्हा येणार…" हा संदेश आणि ठाकूर यांनी दिलेला सूचक प्रतिसाद हे कार्यकर्त्यांसाठी दिलासा देणारे मानले जात आहे. वसई-विरार महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ठाकूर पुन्हा सक्रिय होतील का, पक्षातील दरी कमी करून विरोधकांना ठामपणे सामोरे जातील का, याची उत्सुकता वाढली आहे.

विरार येथील जनसेवा मित्र मंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी उत्सवाला लोकनेते हितेंद्र ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उत्सवाचे आयोजक राज वसंत पाटील होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मंचावरून हितेंद्र ठाकूर हे काय बोलणार याची उत्सुकता होती. मात्र, कुठलाही राजकीय संदेश देण्याचे त्यांनी टाळले.

भाजपचे धक्कातंत्र सुरूच...

वसई-विरार महापालिकेत केवळ दोन नगरसेवक असलेल्या भाजपचा मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून काॅन्फीडन्स वाढला आहे. भाजपच्या वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या पुढाकाराने बविआला धक्का देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. नुकताच बविआमधील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. या पक्षप्रवेशाने वसईतील भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली असून आगामी काळात वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत भाजप-बविआमध्ये काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT