Amit Shah latest news sarkarnama
मुंबई

Amit Shah यांच्या उपस्थितीत शिवसेनेला शह देण्यासाठी ठरणार रणनीती ; मनसेसोबत आघाडी होणार ?

Amit Shah : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवास स्थानी वर्षा बंगल्यावर जावून गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी रात्री ते मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर आता मुंबई महानगर पालिकेवर कमळ फुलवण्यासाठी भाजप (bjp) आपली कंबर कसताना दिसत आहे. त्यापार्श्वभूमीवर शहांचा हा मुंबई दौरा मानला जातो. राज्यातील सत्तातरानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हा पहिलाचं दौरा असल्याने हा दौरा राज्यातील राजकीय दृष्या महत्वाचा आहे. ( Amit Shah latest news)

अमित शहा (Amit Shah) लालबागच्या राजाचं (Laubaug Cha Raja) दर्शन घेणार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभुमीवर शहांच्या या दौऱ्याला विशेष महत्व आहे. या दौऱ्या दरम्यान अमित शाह (Amit Shah) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी भोजन आणि बैठकीसाठी जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवास स्थानी वर्षा बंगल्यावर जावून गणपती बाप्पांचं दर्शन घेणार आहेत.

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार या नेत्यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतील. अमित शहांच्या या दौऱ्याला गणपती दर्शन स्पेशल दौरा अशीही चर्चा आहे. सिध्दविनायकाचं (Siddhivinayak) देखील शहा हे दर्शन घेणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर शहरात कडोकोट बंदोबस्त असणार आहे.

आज ते भाजप कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत. त्यात ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. मुंबई महापालिकेत 29 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता काबीज करण्यासाठी यंदा भाजप विशेष मेहनत घेत आहे. शहांच्या मुंबई दौऱ्यानिमित्ताने मिशन मुंबईचा प्रारंभ होईल. अमित शहा हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून लालबागच्या दर्शनाला येत आहेत. शहा 2017 मध्ये भाजपचे अध्यक्ष झाले होते.

आशिष शेलार हे मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष आहेत. मुंबई महापालिकेची जबाबदारी शेलार यांच्यावर आहे. मुंबई पालिकेत 227 नगरसेवक आहेत. या वेळी मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपने 'मिशन 200'ची घोषणा केली आहे. भाजपबरोबर शिंदे गट आणि मनसेची आघाडी होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT