Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde: औरंग्याची तुलना फडणवीसांशी कशी करता? त्यांनी तुमचे डोळे काढले का? सपकाळांना सोडणार नाही....

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस यांची माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, असा इशारा शिंदे यांनी दिला.

Mangesh Mahale

Mumbai, 18 March 2025: औरंग्याची तुलना तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यांचसोबत कशी करता असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केला.

विधिमंडळ अधिवेशनात शिंदे बोलत होते. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस यांची माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, असा इशारा शिंदे यांनी दिला.

कुठे औरंगजेब अन् कुठे देवेंद्र फडणवीस हे ? तुलना करण्यापूर्वी त्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे होती,असा हल्लाबोल शिंदे यांनी पटोले यांच्याकडे पाहत केला. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या लोकांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही, असा सज्जड दम शिंदेंनी दिला.

"औरंगजेब कोण लागतो ? नातेवाईक लागतोय की सगासोयरा लागतो का आणखी कोण लागतोय ? औरंगजेब हा देशद्रोही आहे, तो राष्ट्रद्रोही आहे. महाराष्ट्रातील, देशभक्त जनता ही त्याला सहन करणार नाही. महाराष्ट्राचा घास घ्यायला औरंगजेब आला होता. त्याला महाराष्ट्र उद्ध्वस्त करायला आला होता. त्याचं समर्थन करणारा कोणीही असेल, त्याला सोडण्यात येणार नाही," असा गर्भित इशारा शिंदे यांनी दिला.

औरंग्या हा महाराष्ट्राला लागलेला कलक आहे, त्याचे समर्थन करणाऱ्यांवर कारवाई होणार असून औरंग्यांचे उदात्तीकरण महाराष्ट्र सहन करणार नाही, त्याची बाजू घेण्याचा केविलवाणी प्रयत्न काही जण करीत आहेत. अशा देशद्रोहींवर कडक कारवाई करणार, असे शिंदे म्हणाले.

पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला आहे, त्यांना काहीही झालं तरी सोडणार नाही. पोलिसांवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही. पोलिस शांतता प्रस्थापित करत होते, अशावेळी त्यांच्यावर केलेला हल्ला अत्यंत चुकीचा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT