Raj Thackeray| Sanjay Raut sarkarnama
मुंबई

'राज ठाकरेंचे योगी आणि भोगींसंदर्भात मनपरिवर्तन कसं झालं?'

Raj Thackeray| Sanjay raut| राजकीयदृष्ट्या भोंग्यांचा विषय तापवण्याचा प्रयत्न

सरकारनामा ब्युरो

मुंबई: 'राज ठाकरेंच योगी आणि भोंगीबाबत मनपरिवर्तन कसं झालं, हा संशोधनाचा विषय आहे, यावर एखादा विद्यार्थी पीएचडी करु शकतो', अशी खोचक टिका शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राजकीयदृष्ट्या भोंग्यांचा विषय तापवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण भोंग्यांबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे भोंग्यांबाबत पालन करेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले. योगी आदित्यनाथ यांनी भोंग्यांबाबत तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. महाराष्ट्र सरकारनेही भोंग्यांबाबत तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. पण भाजप नेते या बैठकीला आले नाहीत. त्यांना भोंग्यांवरून राज्यात अशांतताच निर्माण करायची आहे. लोकांची दिशाभूल करायची आहे, असे राऊत यांनी म्हटले.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना योगी ची उपमा देत त्यांचे कौतुक केले तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भोगी म्हणत खोचक टोलाही लगावला. यावर खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. यावेळी संजय राऊत यांना १ मे रोजी औरंगाबादमध्ये होणाऱ्या मनसेच्या सभेविषयी विचारले असता, संजय राऊत यांनी म्हणाले की, महाराष्ट्रात अनेक सभा होतात. कोल्हापूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी सभा झाली, १ मे ला महाराष्ट्रात सहा सभा होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला सभांचं वावडं नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.

याचवेळी त्यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीने पाठवलेल्या समन्सविषयीही भाष्य केले. ईडीकडून एकाच पक्षाच्या प्रमुख नेत्यांना लक्ष्य करण्याचे काम सुर आहे. पण, आम्ही हे सर्व बघून घेऊ. किरीट सोमय्या हे 'दिलासा घोटाळ्या'चे लाभार्थी आहेत. राज्य सरकारने प्रताप सरनाईकांबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात त्यांनी भूमिका घेतली आहे. पण ते स्वत: गुन्हेगार आहेत.त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT