Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray on Shinde Group: "शिंदे गटातल्या आमदारांचेच भ्रष्टाचार बाहेर कसे येतात? याचा त्यांनी विचार करावा!"

Uddhav Thackeray News: "भुभूक्षित नजर फार वाईट असते, ते आरएसएसच्या कार्यालयावर हक्क सांगतील."

सरकारनामा ब्यूरो

Uddhav Thackeray News: सीमावादाचा ठराव महाराष्ट्राच्या वतीने मांडला गेला. यामध्ये माझी कधीही आडकाठी नाही, दुमत नाही. आम्ही पाठिंबा दिलेला आहे. महाराष्ट्राच्या हिताचं जे काही आहे त्याला आमचा पाठिंबा आहे, असे शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हंटले आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिंदे गटातल्या नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येतात कुठून, याचा विचार त्यांनीच केला पाहिजे. त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो, याचा अर्थ असा नाही की, त्या घोटाळ्यात माझा पाठिंबा होता. आरोप झाले तेव्हा मी एका मंत्र्याचा राजीनाम घेतला. आता त्यांनी विचार केला पाहिजे, ते आपल्याला आधार देतात की, गाडतात, असे ठाकरे म्हणाले.

राज्यपालांचा राजीनामा हा एक महत्त्वाचा मुद्दा होताच. महापुरूषांचा अपमान जो कोणी करेल, त्या पदावर निर्लज्जपणे बसू कसे शकते. राज्यभरात भावनांचा उद्रेक झाल्यानंतर राज्यपाल पदावर ती व्यक्ती बसू कशी शकते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहले, असे म्हणतात, त्याला शाह यांनी काय उत्तर दिले माहित नाही, असेही ठाकेर म्हणाले.

कोत्या मनोवृत्तीचं लक्षण आहे. ज्यांच्यात स्वत: काही करणयाची कुवत नसते, धमक नसते, ते दुसऱ्याचे वडील चोर, पक्ष चोर, कार्यालयावर ताबा घे, असे करत असतात, भुभूक्षित नजर फार वाईट असते. मी आरएसएसला शुभेच्छा देता, त्याच्य़ाकडे मुख्यमंत्री येऊन गेले. कदाचित ते आरएसएसच्या कार्यालयावर हक्क सांगतील, असा खोचक टोला ठाकरे यांनी शिंदेना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT