Sharad Pawar On Ajit Pawar Rebel : राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार हे भाजपसोबतच्या सरकारमध्ये सामिल झाले आहेत. अजित पवारांनी आपल्याला सर्व आमदारांचा पाठींबा आहे, असे अजित पवारांनी दावा केला आहे. यावर आता शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण महाविकास आघाडीसोबतच राहणार असा स्पष्ट निर्धार पवारांनी व्यक्त केला.
शरद पवार म्हणाले, "देशाच्या पंतप्रधानांनी दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित विधान केलं होतं. त्यात दोन गोष्टींचा उल्लेख केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. ते सांगताना राज्य सहकारी बॅंक आणि सिंचन संदर्भातील जी तक्रार होती, त्याचा उल्लेख केला होता. त्यात राष्ट्रवादी पक्ष सहभागी आहे, असाही आरोप केला होता. आज राष्ट्रवादीच्या काही सहकाऱ्यांनी मंत्रिमंडळाची शपथ दिली. याचा अर्थ त्यांनी केलेले सर्व आरोप हे वास्तव नव्हते. सर्व आरोपांतून पक्षाला आणि ज्यांच्याबाबत आरोप केले होते, त्या सगळ्यांना त्यांनी मुक्त केले, त्याबद्दल मी पंतप्रधानांचा आभारी आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत.
शरद पवार म्हणाले, "जे लोक गेले आहेत. त्यांच्यापुढे दोन गोष्टीांची चिंता आहे. त्यांनी आता मतदारसंघाची चिंता आहे. दुसरं म्हणजे पक्षातल्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी संबंध याची चिंता त्यांना अधिक जाणवेल. इथे सत्तेचा गैरवापर होऊ शकेल. चार दोन काम होऊ शकतील. निवडणुकीसाठी जे साहाय्य लागतं, यासाठी त्यांना चिंतामुक्त व्हावं असं वाटेत असेल. पण या सगळ्या गोष्टी शंभर टक्के यश देतील असं नाही. शेवटी लोक ठरवतात, लोकांचा विचार, लोकांचा पाठिंबा महत्त्वाचा असतो. याचीही अनेकांना चिंता असावी म्हणून ते आमच्याशी संपर्क साधतात.
घर तुटलं आपल्याला वाटत नाही. ज्या नेत्यांवर आरोप झाले तेच नेते गेले, राष्ट्रवादी काँग्रसेचे सहकारी गेले असले तरी मी महाविकास आघाडीसोबत आहे. महाविकास आघाडीसोबत कायम सोबत राहणार, असा ठाम विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.