Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis : "मी देवेंद्र फडणवीस बोलतोय...; फोन आला अन् जणू देव भेटला!"

सरकारनामा ब्युरोे

Maharashtra Police : 'आर्मी'मध्ये भरतीचे आयुष्यभराचे स्वप्न. परीक्षा पास होऊनही पोलीस 'व्हेरिफिकेशन'चा अडथळा आला. देशसेवेचे स्वप्न भंग होण्याच्या भीतीने हताश झाला असतानाच शेवटचा आशेचा किरण म्हणून उपमुख्यमंत्री यांच्याशी फेसबुकद्वारे संपर्क साधला अन् चमत्कार झाला. "मी देवेंद्र फडणवीस बोलतोय", असा फोन आला अन् शुभमला जणू देवच पावला!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संवेदनशीलतेबाबत शुभम शिवाजी बोटे (Shubham Bote) याने ट्वीटरवरून कृतज्ञता व्यक्त केली आहे. "साहेब तुमच्या नावातच देव आहे. तुम्ही खरोखर देव आहात", अशी सुरुवात करत शुभामने म्हटले की, "मित्रांनो मी नुकताच 'आर्मी'त भरती झालो." दरम्यान, पोलीस 'व्हेरिफिकेशन'मध्ये अडथळे आले होते. ते कसे सोडविले याची माहिती दिली आहे.

शुभमने सांगितले की, पोलीस 'व्हेरिफिकेशन'मध्ये आलेले अडथळे सुटता सुटत नव्हते. हातातोंडाशी आलेली नोकरी आणि गेली याच अपेक्षेने घरी बसलो. जीव कासावीस झाला. आई-वडिलांच्या कुशीत डोके ठेऊन मोठमोठ्याने रडत होतो. 'आर्मी'मधे जाऊन देशसेवा करण्याच स्वप्न भंगले होते. डोळ्यापुढे संपूर्ण अंधार होता. एखदा फेसबुक स्क्रोल करत असताना देवेंद्रजी फडणवीस यांची फेसबुक अपडेट पुढे आली. माझ्यासोबत झालेला प्रकार देवेंद्रजींना सांगून काय होतेय का, याची चाचपणी सुरु केली. देवेंद्रजींच्या पोस्टवर रोज लाईक कमेन्ट करणाऱ्या २-३ कार्यकर्त्यांना फेसबुक मेसेज केले."

शुभम पुढे म्हणला, "गणेश कराड (Ganesh Karad) यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे स्वीय सहाय्यक मनोज मुंडे यांचा मोबाईल क्रमांक दिला. आजच २० मार्च दुपारी दोन वाजता कागदपत्रे जमा करण्याची शेवटची वेळ होती. सकाळी माझा फोन वाजला. समोरुन मी देवेंद्र फडणवीस बोलतोय, असे वाक्य होते. हे एका चमत्काराच्याही पलीकडे होते. स्वतः साहेब बोलले. त्यांनी माझी अडचण ऐकून घेतली आणि सगळ्या यंत्रणा कामाला लागल्या. पोलीस 'व्हेरिफिकेशन'मधील सर्व अडचणी दूर झाल्या."

यानंतर शुभमने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), त्यांचे स्वीय सहाय्यक देवराम पळसकर, खासगी सचिव दिलीप राजूरकर व कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले. शुभम म्हणाला की, "माझ्या तोंडून सुटलेला घास अलगद माझ्या मुखात घालण्याच काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. थँक्यू अन्नदाता!"

शुभमच्या या ट्वीटरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तितक्याच प्रांजळपणे उत्तर दिले आहे. तसेच त्याला देशसेवेसाठी शुभेच्छाही दिल्या. फडणवीस म्हणाले, "उत्साहाच्या भरात खूप काही लिहिलेस... ना मी देव, ना अन्नदाता! केवळ प्रयत्न करीत असतो, जमेल तितक्या लोकांच्या कामी येण्याचा ! राष्ट्रसेवेची तुझी जिद्द निश्चितच अभिमानास्पद आहे... देशसेवेसाठी तुला खूप खूप शुभेच्छा!"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT