CM Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Video Eknath Shinde : "महायुती सरकारचा कॅप्टन मीच…"; CM शिंदे असं का म्हणाले?

CM Eknath Shinde On Ladaki Bahin Yojna : साम टीव्हीच्या विशेष कार्यक्रम 'ब्लॅक अँड व्हाईट'मध्ये उपस्थितीती लावली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यावर भाष्य केलं. याच कार्यक्रमात त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरु आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला.

Jagdish Patil

Mumbai News, 06 Sep : महायुती सरकारला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकडून विधानसभेच्या निवडणुकीत मोठी अपेक्षा आहे. त्यामुळे युतीतील तिन्ही पक्षांकडून या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात जाहीरात केली जात आहे. शिवाय पक्षाकडून तिचा प्रचार आणि प्रसारही मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

या योजनेला महिलांचा देखील उदंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र, आता याच योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू असल्याची चर्चा आहेत. याच श्रेयवादाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना साम टीव्हीच्या विशेष कार्यक्रम 'ब्लॅक अँड व्हाईट'मध्ये प्रश्न विचारला असता त्यांनी, महायुतीचा कॅप्टन मीच असल्याचं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्हीच्या विशेष कार्यक्रम 'ब्लॅक अँड व्हाईट'मध्ये उपस्थितीती लावली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यावर भाष्य केलं. याच कार्यक्रमात त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नाव लहान असतं तर बरं दिसलं असतं, असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटल्याची आठवण करुन देण्यात आली.

शिवाय या योजनेतला मुख्यमंत्री शब्द गाळता आला असता, असंही बोललं जात आहे, त्यामुळे आता या योजनेवरून महायुतीत (Mahayuti) श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे का? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "या योजनेचं सर्व श्रेय आमच्या बहिणींना जातं. ज्या बहिणांना याचा लाभ मिळतोय. त्या बहिणांसाठी आम्ही ही योजना आणली असून आम्ही कधी श्रेयवादामध्ये पडत नाही."

शिवाय मुख्यमंत्री हा प्रमुख असतो टीमचा कॅप्टन म्हणून, शेवटी लोकांना माहिती आहे ते सुज्ञ आहेत त्यामुळे आम्ही या श्रेयवादात पडत नाही. मी सर्व श्रेय बहि‍णींना देतो. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. त्यामुळे या योजनेत कोणताही श्रेय वाद नाही. जनतेला आम्ही काय देऊ शकतो, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद कसा देऊ शकतो यातच आम्हाला आनंद असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT