Sada Sarvankar Latest News
Sada Sarvankar Latest News Sarkarnama
मुंबई

माझ्याकडे बंदूक आहे पण मी गोळीबार केला नाही...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : प्रभादेवी येथील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या वादाचे पडसाद शनिवारी रात्री उमटले आणि प्रभादेवी (prabhadevi) परिसरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी (ता.१० सप्टेंबर) सकाळी राडा झाला.

त्यानंतर पुन्हा एकदा या दोन्ही गटात मध्यरात्री हाणामारीती घटना घडली आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत २५ ते ३० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून शिवसेनेच्या ५ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र त्यांना आज जामीन मिळाला असून त्यांना सोडण्यात आले आहे. याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यावर गोळीबार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. यावर मी गोळीबार केला नसल्याचे सांगितले आहे. (Sada Sarvankar Latest News)

दरम्यान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आणि त्यांचे सुपूत्र समाधान सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यावर मी गोळीबार केला नाही, माझ्यावर खोटे आरोप करण्यात आल्याचे स्पष्टीकरणं सरवणकरांनी दिलं आहे.

आमदार सरवणकर म्हणाले की, स्वागत कक्षाच्या जवळ एकमेकांना डिवचण्याचा प्रकार झाला होता. मात्र, सोशल मिडियावरील कमेंटच घरी जाऊन उत्तर देणं चुकीच आहे. सोशल मिडियावरच उत्तर सोशल मिडियावरच द्यायचं असत, त्यावरून घरी जावून मारामारी करण्याचा प्रकार दुर्देवी होता. मात्र तो दुर्देवाने घडला आहे.

संतोष तेलवणे यांच्या घरी ४० ते ५० जणं मारायला गेल्याचे समजले. यामुळे मी आणि माझा मुलगा त्या ठिकाणी रात्रीच्या सुमारे साडेबाराला गेलो. मात्र यावेळी आम्ही वाद मिटवण्यासाठी गेलो होतो. जे घडलं ते चुकीच घडलं आहे. यावेळी गोळीबार करण्यात आल्याचा माझ्यावर करण्यात आलेला आरोप हा चुकीचा आहे. माझ्याकडे लायसन्स असलेली बंदूक आहे. मात्र माझ्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा चुकीचा असल्याचे स्पष्टीकरणं सरवणकरांनी दिले आहे.

दरम्यान शिवसेनेच्या ज्या पाच जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना जामीन मिळाला आहे. यानंतर ते शिवसेने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. त्यावेळी ठाकरेंनी त्यांचे कौतुक केले आहे. आता या प्रकरणी पुढे काय होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT