Sushma Andhare
Sushma Andhare Sarkarnama
मुंबई

Sushma Andhare : माझा घातपात होऊ शकतो...; सुषमा अंधारे असं का म्हणाल्या?

सरकारनामा ब्युरो

Sushma Andhare news : शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी धक्कादायक दावा केला आहे. 'माझ्यावर चौकशी लावण्यासाठी काही मिळत नाही म्हणून माझा अपघात घडवला जाऊ शकतो, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

''काही लोक, काही अधिकारी सांगतात, ताई रात्रीचा प्रवास टाळा, घात अपघात होऊ शकतो. अपघातात अनेकदण गेलेत. ताई तुमच्यावर कोणतीही चौकशी लावण्यासारखं काहीच नाहीये, त्यामुळे ते तुम्हाला डायरेक्ट शुट करण्याएवजी तुमचा अपघात घडवून आणु शकतात, काहीही होऊ शकत असा संशय सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे. पण त्यांनी माझी प्रतिकात्मक तिरडी बांधली काय कि त्यांनी प्रत्यक्ष तिरडी बांधायची तयारी ठेवली काय, पण मी मात्र माझं काम प्रामाणिकपणे करायचं ठरवलं आहे आणि मी ते प्रमाणिकपणे करत राहणार,'' असंही अंधारे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील ऐतिहासिक सत्तांतरानंतर सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटात दाखल झाल्यापासून अंधारे यांनी आपल्या अभ्यासपुर्ण भाषणांनी सत्ताधाऱ्यांनाही सळो की पळो करुन सोडलं आहे. त्यातच अवघ्या पाच सहा महिन्यांपुर्वी ठाकरे गटात दाखल झाल्यानंतर अंधारे यांच्या भाषणांची थेट मुख्यमंत्र्यांना दखल घ्यावी लागतेय. अंधारे यांनी केलेल्या टीकांमुळे सत्ताधारी पक्षातील नेतेही वैतागून गेले आहेत. मात्र इतर नेत्यांप्रमाणे अंधारे यांच्यावर एखादा गुन्हा दाखल करण्यासाठी किंवा त्यांची चौकशी लावण्यासाठी सत्ताधाऱ्यांना कोणताही मुद्दा सापडत नसल्याने आपला घातपात होऊ शकतो, असा दावा अंधारे यांनी केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून काही राजकीय नेत्यांच्या अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. दिवंगत नेते विनायक मेटे, भाजप आमदार जयकुमार गोरे त्यांच्यानंतर आमदार धनंजय मुंडे यांच्या अपघाताच्या घटनांमुळे राजकीय वर्तुळात सध्या गोंधळाचे वातावरण आहे. त्यात अपघातांच्या या घटना घातपात असल्याचे संशयही व्यक्त केले जात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT