Devendra Fadanvis Sarkarnama
मुंबई

ज्यांना अक्कल कमी आहे त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही; असं का म्हणाले देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis|PFI| केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या इस्लामिक संघटनेवर पुढील 5 वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला

सरकारनामा ब्युरो

मुंबई : केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या इस्लामिक संघटनेवर पुढील 5 वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला. पीएफआयवरील या बंदीनंतर भाजप नेत्यांकडून या निर्णयाचे स्वागत होत असताना दुसरीकडे काँग्रेसच्या (Congress) एका खासदाराने थेट आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. पण असं मुर्खासारखे बोलणारे अनेक लोक आहे. त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कॉंग्रेसच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

केंद्र सरकारच्या या कारवाईवर काँग्रेस खासदार कोडीकुन्नील सुरेश यांनी पीएफआयप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही बंदी घालण्याची मागणी केली. या मागणीनंतर देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, ते म्हणाले की, असं मुर्खासारखे बोलणारे अनेक लोक आहे. या देशात कायदा आहे, संविधान आहे. कोणत्याही संघटनेवर कारवाई करायची असेल तर त्यासाठी पुरावे लागतात, पण आतापर्यंत ते बिगर भाजपशासित राज्यात आरएसएसच्या विरोधात एकही घटना ते शोधू शकले का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

उलट केरळ सारख्या बिगर भाजप शासित राज्यातूनच सर्वात आधी या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे अशा मुर्खासारखे बोलणाऱ्या आणि ज्यांना अक्कल कमी आहे, त्यांना मी उत्तर देत नाही. अशा सडेतोड शब्दांत त्यांनी कॉंग्रेसला सुनावलं आहे.

काही लोक देशात दहशत वादी कृत्य करून देशाचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत होते. वेगवेगळ्या माध्यमातून देशात तेढ निर्माण करण्याचे काम करत होते, त्यात पीएफआय बद्दल अनेक पुरावे केंद्रीय तपास यंत्रणांना मिळाले आहेत. हिंसाचारासाठी हळूहळु त्यांच्याकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते, त्यासाठी पैसा खर्च करायचा, लोकांची माथी भडकवायची आणि हिंसाचार घडवून आणायचा, अशा अनेक घटना पीएफआयकडून घडवून आणल्याचे पुरावे मिळाले. विशेष म्हणजे केरळ सरकारने सर्वात आधी या संघटनेवर बंदी घाला, अशी मागणी केली होती. त्यानंतर विविध राज्यातून ही मागणी होत होती. यासर्व गोष्टीचे पुरावे उपलब्ध आहेत याचमुळे केद्र सरकारने बंदी घातली आहे.

पीएफआय हा एक सायलेंट किलर होता. एक मानवी चेहरा दाखवायचा आणि पाठीमागून देशद्रोही कृत्य करायची. यात वेगवेगळे लोक आहेत. त्यांच्या सहभागानुसार त्यांच्यावर कारवाई होईल. यात अनेक पुरावे मिळाले आहेत. महाराष्ट्रातही याबाबत लवकरच कारवाई सुरु करणार आहे. काही लोक एकत्र आले आणि त्यांनी पीएफआय सारखी संघटना सुरु केली. त्यातून त्यांनी अशी देशविघातक कृत्ये सुरु केली, यात अनेक लोक त्यांच्या निशाण्यावर होते, काही लोक हिटलिस्टवर होते. काही लोकांवर हल्ले करण्याचा त्यांचा प्लॅन होता. पण आता हळुहळु या सर्व गोष्टी बाहेर येतील. असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT