Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News : 'पहाटेच्या शपथविधीवर मला बोलायचे नाही' ; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं!

Ajit Pawar : तुम्ही मला पुन्हा पुन्हा हा प्रश्न विचारू नका!

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar News : महाराष्ट्राचे राजकारण पहाटेच्या शपथविधीवरुन पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधी संदर्भात गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. या प्रकणाची राज्यभरात चर्चा होत आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा पाठिंबा होता, असा दावा केला होता. त्यांच्या सूचनेनुसारच मंत्रीमंडळही स्थापन होणार होते. या प्रकरणी विरोधीपक्ष अजित पवार बोलले तर मी सविस्तर सांगेन, असेही फडणवीस म्हणाले होते. शरद पवार यांनी मात्र फडणवीस यांच्या विधानेच खंडन केले होते.

आज अजित पवार यांना पहाटेच्या शपथविधीवर प्रतिक्रिया विचारले असता, पवार म्हणाले की, "मी पहाटेच्या शपथविधीवर काहीही बोलणार नाही. मी तीन वर्षांपूर्वीच सांगितलं होतं, पहाटेच्या शपथविधीवर मला बोलायचे नाही, तुम्ही मला पुन्हा पुन्हा याबाबत का विचारता?, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार (Ajit Pawar) हे पुण्यातील एका कार्यक्रमासाठी आले होते. तेथे माध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांनी बगल देऊन निघून गेले. त्यामुळे धडाकेबाज अजित पवार काहीही न बोलता निघून गेल्याने, आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अजित पवार हे फडणवीस यांच्या वक्तव्यावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र त्यांनी काहीही बोलणे टाळले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT