Lipi Rastogi Death Sarkarnama
मुंबई

Mumbai News: IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?

IAS Officers Daughter Dies After Jumping From 10th Floor: मुंबईतील एका IAS अधिकाऱ्याच्या मुलीने इमारतीच्या 10 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jagdish Patil

IAS officers Daughter Commits Suicide : मुंबईतील एका IAS अधिकाऱ्याच्या मुलीने इमारतीच्या 10 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव लिपी रस्तोगी असं आहे. 27 वर्षीय मुलीने केलेल्या या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आत्महत्या केलेल्या मुलीच्या वडिलांचे नाव विकास रस्तोगी असे असून ते शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. शैक्षणिक कामगिरीवर चिंतित असल्याने लिपी हिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने तिच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचा उल्लेख केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 4 वाजता मंत्रालयासमोरच्या एका इमारतीच्या 10 व्या मजल्यावरून लिपी रस्तोगीने (Lipi Rastogi) उडी मारली यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर लिपीच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र ती शैक्षणिक कामगिरीवरुन चिंताग्रस्त होती आणि याच नैराश्यातून तिने हे टोकाचं पाऊल उचचल्याचं बोललं जात आहे.

लिपी रस्तोगीने हरियाणाच्या सोनिपत येथून एलएलबीच (LLB) शिक्षण घेत होती. दरम्यान तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सध्या पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

विकास रस्तोगी शिक्षण विभागात सचिव आहेत तर त्यांच्या पत्नी राधिका रस्तोगी चलन विभागात सचिव आहेत. तर अशा सुशिक्षित कुटुंबातील मुलीने एवढं टोकाचं पाऊल का उचललं असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT