Arvind kejariwal news delhi Chief minister  sarkarnama
मुंबई

'भाजपमध्ये हिंमत असेल तर...', केजरीवालांचे मोदी सरकारला ओपन चॅलेंज

दिल्लीच्या (Delhi) उपराज्यपालांच्या आदेशानुसार दिल्लीतील तीन महानगरपालिकांच्या निवडणुका (MCD Election) अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : 'हिंमत असेल तर एमसीडी निवडणुका वेळेवर करा आणि जिंकून दाखवा, आम्ही राजकारण सोडू.' अशा शब्दांत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी भाजपला (BJP) खुले आव्हान दिले आहे. इतकेच नव्हे तर, भाजप स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवतो, पण भाजपला दिल्लीतील एका छोट्या पक्षाची भीती वाटली तुम्ही दिल्लीच्या छोट्या निवडणुकीला घाबरलात, तुमच्याच काय हिंमत, असे खरमरीत टीकाही केजरीवाल यांनी केली आहे. (Arvind kejariwal open challenge to BJP)

दिल्लीच्या उपराज्यपालांच्या आदेशानुसार दिल्लीतील तीन महानगरपालिकांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यावर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने भाजपला जोरदार घेरले आहे. भाजपला त्यांच्या पक्षाची भीती वाटते, म्हणून त्यांनी निवडणूक पुढे ढकलल्याचा दावा आपने केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आप आणि भाजप आमनेसामने आले आहेत.

दिल्ली महापालिकेची निवडणूक पुढे ढकलणे म्हणजे देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान करण्यासारखे आहे. आज ते पराभवाच्या भीतीने दिल्ली महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलत आहेत, उद्या ते राज्यांच्या आणि देशाच्या निवडणुका पुढे ढकलतील. दिल्लीतील तिन्ही कॉर्पोरेशन एकत्र येत असलेल्या एमसीडीच्या निवडणुका भाजप पुढे ढकलत आहेत, त्यामुळे निवडणुका पुढे ढकलता येतील का? असा सवालही त्यांनी विचारला.

आज शहीद दिन आहे. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना आजच्याच दिवशी फाशी देण्यात आली होती. देशाला स्वतंत्र करण्यासाठी तिघांनीही बलिदान दिले होते. देश स्वतंत्र झाला, राज्यघटना झाली, जनतेने आपले सरकार निवडावे आणि त्या सरकारने जनतेची स्वप्ने पूर्ण करावीत, असे संविधानात जनतेला पूर्ण अधिकार दिले गेले. गेल्या काही दिवसांपासून जे काही दिसत आहे, तो एक प्रकारे हुतात्म्यांच्या बलिदानाचा अपमानच आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार दिल्लीतील महापालिका निवडणुका पुढे ढकलत असल्याचा आरोप यावळी केजरीवाल यांनी केला.

भाजपचा सफाया होणार होता, हे सर्वांना माहीत आहे आणि त्यांचा पराभव टाळण्यासाठी त्यांनी आधी राज्य निवडणूक आयोगावर निवडणुका पुढे ढकलण्यासाठी दबाव आणला आणि आता दुरुस्त्या आणत आहेत. या देशात निवडणुका झाल्या नाहीत तर लोकशाही कशी टिकणार, जनतेचा आवाज कसा टिकणार,असा सवालही केजरीवाल यांनी उपस्थित केला.

सरकार येऊन निवडणुका संपवतील,असे स्वातंत्र्य आजपर्यंत कधीही नव्हते. या देशात लोकांना सरकार निवडण्याचा मूलभूत अधिकार आहे. तीन महापालिका एकत्र करायच्या आहेत, म्हणून आम्ही निवडणूका पुढे ढकलत असल्याचे ते म्हणत आहेत. पण या आधारावर निवडणूक पुढे ढकलता येईल का? मी पंतप्रधानांना हात जोडून आवाहन करतो की उद्या भाजपा असो वा आम आदमी पार्टी, मोदीजी असो वा केजरीवाल असो, या देशाचा उद्धार झाला पाहिजे. छोटी निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही या देशाच्या व्यवस्थेशी खेळत आहात. हे आम्हाला अजिबात मान्य नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT