Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
मुंबई

'उद्याेगधंदे गुजरातला जात असतील तर महाराष्ट्रातल्या तरूणांनी हनुमान चालिसा म्हणायची का?'

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाराष्ट्रातून एअर बस प्रकल्प गुजरातला गेल्यावर आता सरकारवर विविध स्तरातून टीका होत आहे. विरोधकांकडून राज्य सरकारला धारेवर धरले जात आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना सडकून टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लेबोल केला आहे. महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरात राज्यात निघून गेल्यावर महाराष्ट्रातील तरूणांनी काय, हनुमान चालिसा म्हणायची का? असा खोचक सवाल त्यांनी सरकारला विचारला.

मोठे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर जातायेत. टाटा समूह यांनी महाराष्ट्राला कायम प्रधान्य दिले आहे. कल्पना नाही काय झालं अचानक, आपले प्रकल्प त्यांनी गुजरातला नेले. आता महाराष्ट्रातील तरूणांनी काय करायचं? आरत्या करा, हनुमान चालीसा म्हणा, फटाके उडवा, दहीहंडी करत बसू आपण, असा खोचक वार त्यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर केला आहे.

देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांच्या शब्दाला दिल्लीत किंमत आहे. त्यांनी तरी त्या मानाने प्रयत्न करायला पाहिजे होते. मुख्यमंत्री हे करू शकणार नाहीत. पण फडणवीसांनी यात लक्ष घातले पाहिजे. याच्या पुढे त्यांनी काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी फडणवीसांनी दिला.

टाटा एअरबस हा प्रकल्प नाशकात यावा यासाठी प्रयत्न केले होते. टाटा एअरबस प्रकल्पाला नाशकात येण्याची विनंती केली होती. यासाठी टाटांशी पत्रव्यवहारही केला होता, याची आठवणही यावेळी भुजबळांनी करून दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT