Kirit Somaiya
Kirit Somaiya 
मुंबई

रिसॉर्ट अनिल परबांचा नाही तर त्यांनी टॅक्स का भरला?; किरीट सोमय्यांचा सवाल

सरकारनामा ब्युरो

Kirit somaiya latest news

मुंबई : किरीट सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या घोटाळ्याची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी याचिका मी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. अनिल परब यांनी मोठ्या प्रमाणात काळा पैसा वापरला आणि स्वत:च याचा पुरावाही दिल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सोमय्यांनी (Kirit Somaiya) अनिल परब यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत.

प्राप्तिकर विभागाला अनिल परब यांनी दिलेल्या जबाबातूनच ही माहिती समोर आली आहे. २०१९ मध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अनिल परब यांनी दापोलीचा रिसॉर्ट आपल्या नावावर करुन घेतला. विभास साठे यांनी परब यांना हा रिसॉर्ट गिफ्ट म्हणून मोफत दिल्याचं भासावलंं. दापोलीतील साई रिसॉर्ट हे १६ हजार ६८३ स्क्वेअर फुटांचे बांधकाम असून आज बाजारभावानुसार २५ कोटी रुपये किंमतीचा आहे.

गेल्या चार वर्षांपासून परब या रिसॉर्टचा प्रॉपर्टी टॅक्स भरत आहेत. पण अनिल परब त्यांचा या रिसॉर्टशी संबंध नसल्याचे सांगत आहेत. उद्धव ठाकरेंनी १९ बंगल्यांचे घोटाळे केले. अनिल परबही त्याच माळेतले मणी आहेत. असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. दापोलीतील मुरुड गावातील साई रिसॉर्ट हा बेकादयेशीर आहे. तसेच या रिसॉर्टच्या बांधकामात काळ्या पैशांचा वापर केल्याचा आरोपही सोमय्यांनी केला आहे. २०१९ मध्ये परब यांनी शासनाकडे साई रिसॉर्ट त्यांचाच असल्याचा अर्ज केला होता. रिसॉर्टची २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या तीन वर्षांची घरपट्टी, मालमत्ता कर अनिल परब यांनी भरला असल्याचा दावाही किरीट सोमय्यांनी केला.

अनिल परब म्हणतात, माझा त्या रिसॉर्टशी संबंध नाही, असे असेल तर अनिल परब यांनी २०२०-२१ चा मालमत्ता कर आपल्या खात्यातून कसा भरला. रिसॉर्ट सदानंद कदम यांचे आहे तर तुम्ही का कर भरत होते, असा सवाल किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे. माझ्याकडे १७ डिसेंबर २०२० ची त्यांनी कर भरल्याची पावती आहे.

मार्च 2022 महिन्यात दापोली कोर्टात केंद्र सरकारने अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंबंधीची याचिका दाखल केली. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने 31 जानेवारी 2022 रोजी हा रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचे सांगत 90 दिवसांत तोडण्याचे आदेश दिले, असेही किरीट सोमय्यांनी सांगितले. याच वेळी त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. 'आदित्य ठाकरेंना माझा प्रश्न आहे ते पर्यावरणाचे दुसऱ्यांना सल्ला देतात, मात्र त्याचे मंत्रीच कायदा पायदळी तुडवत आहे.'' असे सोमय्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT