Ajit Pawar | Sanjay Raut  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : 'पवारांच्या जागी आम्ही असतो तर अजित पवारांना दारातही उभं केलं नसतं'!

Sanjay Raut on Ajit Pawar : अजित पवार आणि त्यांच्या नऊ मंत्र्यांनी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटरला भेट घेतली

सरकारनामा ब्यूरो

Sanjay Raut Criticized on Ajit Pawar : "जे पक्षाच्या विरोधात गेले त्यांना आम्ही आमच्या दारातही प्रवेश देत नाही. आम्ही जर शरद पवार यांच्या या जागी असतो तर अजित पवार आणि त्यांच्या गटाला गेटलॉस्ट केलं असतं", अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे.

राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या नऊ मंत्र्यांनी यांनी रविवारी ( १६ जुलै) त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटरला भेट घेतली. यावेळी यावेळी संबंधित मंत्र्यांनी त्यांना भाजपसोबत चलण्याचा आग्रह शरद पवार यांच्याकडे धरला. पण पवारांनी त्यांचा कोणताही ऐकून घेऊन काहीच प्रतिक्रिया दिली नाही. शेवटी अजित पवार आणि त्यांच्या गटाच्या नेते, रिकाम्या हाताने बाहेर पडले, या भेटीवर संजय राऊत यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

"राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून फुटलेले आमदार अपात्र ठरणार आहेत. त्यामुळेच अजित पवार यांच्या गटाचे मंत्री शरद पवार यांच्याकडे गेले होते. आम्ही शरद पवार यांच्या जागी असतो तर अजितदादांना गेट लॉस्ट केलं असतं. पण शरद पवार साहेबांचा स्वभाव वेगळा आहे. प्रत्येकाच्या स्वभावामध्ये काही गुण-दोष असतात, त्यांनी आजपर्यंत त्यांच्या स्वभावाप्रमाणे काम केलं आहे."

संजय राऊत म्हणाले, "शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा आणि त्यांच्या नेत्यांचा स्वभाव वेगळा आहे. रस्त्यावर उतरुन लढाई करणं, हा शिवसेनेचा स्वभाव आहे. पण राष्ट्रवादीचा स्वभाव शांत आणि संयमी आहे.ते विचार करुन ते निर्णय घेतात. तितकीच नातीगोतीही जपतात. पण ज्यांनी पक्षाच्या विरोधात, विचारांच्या विरोधात भूमिका घेतली त्यांच्यासाठी आमची दारे बंद झाली आहेत. पण आम्ही शरद पवार साहेबांच्या जागी असतो तर दादा आणि त्यांच्या नेत्यांना दारातही उभं केलं नसतं, आम्ही त्यांना गेटलॉस्ट केलं असतं", अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT