IIT Bombay Student Death | Sahil Wakode CCTV Sarkarnama
मुंबई

Sahil Wakode Death Case : IIT बॉम्बेच्या एक्झाम हॉलमध्ये 'त्या' दिवशी नेमकं घडलं? साहिल वाकोडे प्रकरणातील 'ते' CCTV फुटेज समोर

IIT Bombay Student Death : व्हिडिओत पेपर संपण्यासाठी काही मिनिटे बाकी असताना, दुपारी साडेबारा ते पावणे एकच्या दरम्यान साहिल आपल्या खिशात काहीतरी पाहत असल्याचं CCTVमध्ये दिसतं. त्यावेळी पर्यवेक्षक त्याच्याजवळ येतात. यानंतर साहिल काही वेळासाठी आपल्या जागेवरून उठतो आणि पुन्हा बसतो.

Jagdish Patil

Sahil Wakode Death Case : आयआयटी बॉम्बेमधील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. साहिलने आत्महत्या करण्यापूर्वी एक्झाम हॉलमध्ये नेमकं काय घडलं होतं, याचा CCTV फुटेज समोर आला आहे. परीक्षेदरम्यान साहिलला एका प्राध्यापकांनी थांबवलं आणि त्याच्याशी चर्चा केल्याचं या फुटेजमध्ये दिसत आहे.

गेल्या शुक्रवारी झालेल्या परीक्षेदरम्यान साहिल पहिल्या रांगेत बसला होता. पेपर संपण्यासाठी काही मिनिटे बाकी असताना, दुपारी साडेबारा ते पावणे एकच्या दरम्यान साहिल आपल्या खिशात काहीतरी पाहत असल्याचं CCTVमध्ये दिसतं. त्यावेळी पर्यवेक्षक त्याच्याजवळ येतात. यानंतर साहिल काही वेळासाठी आपल्या जागेवरून उठतो आणि पुन्हा बसतो.

त्यानंतर तो खिशातून मोबाईल काढून प्राध्यापकांकडे देतो. दोघांमध्ये काही वेळ चर्चा होते. त्यानंतर प्राध्यापक साहिलला इतर विद्यार्थ्यांपासून दूर घेऊन जातात. पुढे साहिल आपलं सर्व सामान घेऊन एक्झाम हॉलमधून बाहेर पडताना दिसतो. लॉबीमधील CCTV नुसार, दुपारी सुमारे १ वाजून २५ मिनिटांनी साहिल हॉस्टेलमधील आपल्या रूममध्ये गेला. त्यानंतर तो पुन्हा बाहेर आला नाही. काही तासांनी त्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली.

ChatGPT वापरल्याचा IIT प्रशासनाचा दावा

या घटनेनंतर IIT बॉम्बे प्रशासनाने दुःख व्यक्त केलं आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, साहिल परीक्षेदरम्यान मोबाईल वापरताना आढळला होता. त्याने प्रश्नपत्रिका ChatGPTवर अपलोड करून त्यातून उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न केल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. मात्र, या प्रकारानंतर साहिलवर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नव्हती, असं IIT प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

साहिलच्या पालकांकडून प्राध्यापकांवर आरोप

दरम्यान, साहिलच्या आई-वडिलांनी IIT प्रशासन आणि एका प्राध्यापकांवर गंभीर आरोप केले आहेत. साहिलला संस्थेत जातीय भेदभावाचा सामना करावा लागत असल्याचा दावा त्याचे वडील रवींद्र वाकोडे आणि आई सोनाली वाकोडे यांनी केला आहे. प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला हे साहिलबरोबर जातीय भेदभाव करत असल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला. साहिलने याबाबत आपल्याला आधीच सांगितलं होतं, असंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र, IITमध्ये प्रवेश मिळणं कठीण असल्याने आपण साहिलला परिस्थितीशी जुळवून घेण्याचा सल्ला दिल्याचं त्यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT