Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

"राज ठाकरेंवर तुटून पडा" : शिवसेना प्रवक्त्यांना उद्धव ठाकरेंचा स्पष्ट आदेश

Shivsena | Uddhav Thackeray | Raj Thackeray | MNS : शिवसेना अधिक आक्रमक होणार..?

सरकारनामा ब्युरो

पुणे : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्मााण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबादची (Aurangabad) १ मे रोजी होणारी नियोजीत सभा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. शिवाय या सभेला आता पोलिसांकडूनही परवानगी मिळाली आहे. राज ठाकरे यांची यापूर्वीची गुडीपाडव्याची सभा, त्यानंतरची ठाण्यातील उत्तरसभा यामध्ये त्यांनी घेतलेल्या हिंदूत्वाच्या भूमिकेमुळे राज्यभरात वेगळेच वातावरण तयार झाले आहे. त्याचवेळी भाजप-मनसे युतीची चर्चाही दबक्या आवाजत सुरु आहे.

याच सगळ्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांची आणि शिवसेना प्रवक्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सर्व प्रवक्त्यांना राज ठाकरेंवर तुटून पडा असे आदेश दिले असल्याची माहिती मिळत आहे. बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? राम मंदिर यात्रेवेळी राज ठाकरेंचं काय सुरु होतं? त्यांचं हिंदुत्व किती बोगस आहे हे सगळ्यांना दाखवा, सडेतोड उत्तर द्या, असे स्पष्ट आदेश देण्यात आल्याची माहिती आहे. शिवाय बैठकीत शिवसंपर्क अभियान आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाली आहे.

हे नेते बैठकीसाठी उपस्थित

खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, सचिन आह्रिर, सुनील प्रभू, किशोरीताई पेडणेकर, शितल म्हात्रे, शुभा राऊळ, किशोर कान्हेरे, संजना घाडी, आनंदराव दुबे, किशोर तिवारी, हर्षल प्रधान, विनायक राऊत, ओमराजे निंबाळकर, अनिल देसाई, हेमंत पाटील, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, संजय मंडलिक, भावना गवळी, श्रीकांत शिंदे हे नेते बैठकीसाठी वर्षा बंगल्यावर उपस्थित होते.

दरम्यान राज ठाकरेंच्या या सभेनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचीही येत्या ८ दिवसांमध्ये औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेण्यासाठी तयारी सुरु आहे. त्यासाठी सध्या प्राथमिक पातळीवर चर्चा आणि नियोजन सुरु असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी बोलताना उद्धव ठाकरे यांनी एक जाहीर सभा घेवून नवहिंदुत्ववाद्यांना उत्तर देणार असल्याचे सांगितले होते. इतकेच नाही तर उद्धव ठाकरे हे देखील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरच सभा घेणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेवरील आणि सरकारवरील हल्ल्यांना औरंगाबादमध्ये जावूनच उत्तर देणार असे म्हटल्याल चुकीचे ठरणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT