Rutuja Latke, Murji Patel sarkarnama
मुंबई

Andheri By election : लटकेंवर 18 लाखांचे कर्ज, पटेलांकडे 4.92 कोटींची संपत्ती

Andheri By election : अर्ज भरण्यापूर्वी पटेल, लटके यांनी शक्तीप्रदर्शन केले.

सरकारनामा ब्युरो

मुंबई :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) उमेदवार म्हणून अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri By election) ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी अर्ज भरला आहे.

तर भाजपकडून मुरजी पटेल ( Murji Patel) यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्ज भरण्यापूर्वी पटेल, लटके यांनी शक्तीप्रदर्शन केले. (Andheri Vidhan Sabha By-election 2022)

मुरजी पटेल यांचा अर्ज भरताना भाजपचे नेते आशिष शेलार, प्रविण दरेकर, शिंदे गटाचे दीपक केसरकर उपस्थित होते. तर लटके यांनी अनिल परब, आदित्य ठाकरे, कॉंग्रेसचे नेते भाई जगताप यांच्या उपस्थिती आपला उमेदवारी अर्ज भरला.

मुरजी पटले यांनी 2019 मध्ये ​​भाजपविरोधात बंडखोरी केली आणि अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

मुरजी पटेलांकडे 2019 मध्ये 4.92 कोटींची संपत्ती आहे,तर ऋतुजा लटकेंकडे 50 लाख रुपयांची मालमत्ता असून त्यांच्यावर 18 लाखांचे कर्ज असल्याची माहिती त्यांच्या उमेदवारी अर्जावरुन समोर आली आहे.

ऋतुजा लटकेंकडे 50 लाख रुपयांची मालमत्ता

ऋतुजा यांचे पती दिवगंत रमेश लटके यांनी 2019 मध्ये शिवसेनेचे उमेदवार म्हणून अर्ज भरला तेव्हा त्यांनी स्वतःकडे 1.27 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता होती. यासोबतच पत्नी ऋतुजा लटके यांच्याकडे सुमारे 22 लाख रुपयांची जंगम मालमत्ता असल्याची माहिती दिली होती. या मालमत्तेत आतापर्यंत वाढ झाली की घट हे अजून समोर आले नाही. लटके यांनी निवडणूक आयोगाला स्वत:कडे असलेल्या 2.70 कोटी रुपयांच्या आणि पत्नी ऋतुजा यांच्याकडे 50 लाख रुपयांच्या स्थावर संपत्तीची माहिती दिली होती. तसेच 2019 मध्ये स्वतःवर 1.16 कोटी रुपये आणि पत्नीवर 18.81 लाखांचे कर्ज असल्याची माहिती माहिती दिली होती.

मुरजी पटले यांच्याकडे असलेली संपत्ती..

पटेल यांनी 2019 मध्ये शपथपत्रात खुलासा केला होता की त्यांच्या स्वतःकडे 1.95 कोटी रुपये आणि पत्नीकडे 1.85 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. 2019 त्यांनी शपथपत्रात स्वतःकडे 65.63 लाख आणि पत्नी केसरबेन यांच्याकडे 46.64 लाख रुपयांची जंगम मालमत्ता असल्याची माहिती दिली होती. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या भावना पटेल यांच्याकडे 5.05 लाख, मनीषा पटेल यांच्याकडे 1.50 लाख आणि पार्थ पटेल यांच्याकडे 60 हजार रुपयांची जंगम मालमत्ता असल्याची माहिती देण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT