Navneet Rana and Ravi Rana  Sarkarnama
मुंबई

Navneet and Ravi Rana News : 'मातोश्री' समोर हनुमान चालीसा पठण प्रकरणी राणा दाम्पत्यास झटका!

Hanuman Chalisa in front of Matoshree : न्यायालयाने दोषमुक्तीची याचिका फेटाळली, खटल्याच्या प्रक्रियेस सुरुवात

Mayur Ratnaparkhe

Mumbai News : शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानाबाहेर सामूहिक हनुमान चालीसा पठण केल्याप्रकरणी, खासदार नवनीत राणा(Navneet Rana) आणि आमदार रवी राणा या दाम्पत्यास एमपीएमएलए न्यायालयाकडून झटका बसला आहे.

या प्रकरणी गुन्हातून दोषमुक्त करण्यासाठी राणा दाम्पत्याने केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. राणा दाम्पत्याने तांत्रिक कारणांवर दोषमुक्त करण्याचा अर्ज केला होता. तर त्यांना दोषमुक्त करण्यास पोलिसांनी विरोध दर्शवला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा(Ravi Rana) यांना, न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सत्र न्यायालाकडून 5 जानेवारीला याप्रकरणी होणार आरोप निश्चित होणार आहे.

याप्रकरणी एफआयआर दाखल होण्यापूर्वीच झालेली अटक ही बेकायदेशीर असल्याचे राणा दाम्पत्याचे म्हणणे होते. मात्र न्यायालयाने त्यांचा दावा फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी याप्रकरणी निकाल दिला आहे.

आता राणा दाम्पत्याची याचिका न्यायालयाने फेटाळल्याने खटल्याच्या कारवाईस सुरुवात झाली आहे. याप्रकरणी 5 जानेवारीला आरोप निश्चिती होणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT