Narayan Rane
Narayan Rane Sarkarnama
मुंबई

नगरपंचायतीच्या निवडणुकीचा राणेंना विसर अन् थेट मागितले 13 आमदार...

सरकारनामा ब्युरो

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या (Election) प्रचाराचा रविवारी शेवटचा दिवस होता. या प्रचारसभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीही मतदारांना भाजपच्या (BJP) उमेदवारांना निवडून देण्यासाठी भावनिक आवाहन केलं. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

राणे यांनी भाषणादरम्यान मतदारांना भावनिक साद घातली खरी पण ते ही निवडणूक नंगरपंचायतीची असल्याचे विसरून गेल्याचे दिसून आले. भाषण करताना ते म्हणाले, मी राजकीय भाषण करणार नाही. पण हा जिल्हा म्हणजे माझे कुटुंब समजतो. मी तुमच्याच घरातला एक आहे. म्हणून भावनिक वृत्तीने, आदराच्या भावनेतून तुमचे माझे संबध राजकर्ता म्हणून नाहीत. तुम्ही मला दादा म्हणून हाक मारल्यानंतर मी भारावून जातो.

माझे आयुष्य असेपर्यंत मी कितीही झटलो तरी तुमचे उपकार विसरू शकत नाही. अशी माझी भावना आहे. त्यामुळे तुम्ही मला फक्त तेरा आमदार द्या, तुमचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं राणे म्हणाले. यावेळी ते बोलण्याच्या भरात ही विधानसभेची निवडणूक नसून नगरपंचायतीची असल्याचे विसरून गेल्याचे दिसले.

मी सिंधुदूर्ग (Sindhudurg) जिल्हा उद्योगमय करणार आहे. भरभराट झालेला जिल्हा बनवण्याचे मानस आहे. मला गरीब शब्दच आवडत नाहीत. त्यामुळे मेहनतीला बुध्दीची जोड देऊन येथील लोकांना व्यवसाय करावा. त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही राणे यांनी यावेळी सांगितले. राणे यांनी यावेळी सी वर्ल्ड प्रकल्पावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

सिंधुदुर्गात हा प्रकल्प कधीच सुरू झाला असता. जगभरातील पर्यटक जिल्ह्यात आले असते. दोन फाईव्ह स्टार हॉटेल उभी रहाणार होती . त्या 5 स्टार मध्ये अनेक तरुण-तरूणींना नोकऱ्या मिळाल्या असत्या. पण कपाळ करंट्यांमुळे हा प्रकल्प रद्द झाला. सरकारच्या तिजोरीत शंभर कोटी राखून ठेवले होते. पण हे पैसे खर्च केले, अशी टीका राणे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT