I.N.D.I.A Alliance Sarkarnama
मुंबई

Loksabha Election 2024 : महायुतीपाठोपाठ I.N.D.I.A आघाडीही मुंबईत करणार जोरदार शक्तिप्रदर्शन!

सरकारनामा ब्यूरो

I.N.D.I.A Alliance Vs Mahayuti : देशभर लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत. तर, 20 मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तत्पुर्वी मुंबईत उद्या म्हणजेच शुक्रवार 17 मे रोजी महायुतीची महाप्रचारसभा होणार आहे.

या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एका मंचावर दिसणार आहेत. तर दुसऱ्या बाजूला इंडी आघाडीही मुंबईत शक्तीप्रदर्शन करणार आहे. इंडी आघाडीच्या या रॅलीत सर्वच विरोधी पक्षाचे नेते सहभागी होणार आहेत.

यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार(Sharad Pawar), उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदींचा सहभाग असणार आहे. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता ही रॅली होणार आहे. या रॅलीत गांधी कुटुंबातील कोणीही सदस्य नसणार असल्याची माहिती समोर आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एवढच नाहीतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममना बॅनर्जी, समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव हे देखील अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर 18 मे रोजी इंडी आघाडीच्या नेत्यांची मुंबईतच संयुक्त पत्रकारपरिषद होणार आहे आणि वांद्र कुर्ला संकुलात मेळावा होणार आहे.

अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे(Congress) प्रभारी रमेश चेन्निथल्ला यांनी दिली आहे. विशेष म्हणजे ठाकर गटाने शिवाजी पार्क येथे 17 मे रोजी इंडी आघाडीच्या मेळाव्यासाठी अर्ज केला होता, जो बीएमसीकडून फेटाळला गेला, ज्यामुळे आता हा मेळावा बीकेसीमध्ये होणार आहे.

भाजप (Bjp) नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्याचे उत्पादन शुल्क विभाग मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना दुजोरा दिला आहे. देसाई यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट करताना 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते महायुतीत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT