Gautam Adani & Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

मोठी बातमी : उद्योगपती गौतम अदानींनी घेतली उद्धव ठाकरेंची गुप्त भेट

Uddhav Thackeray : राज्यात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची चर्चा जोरात रंगत आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : काही दिवसांपुर्वीच जगातील श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आलेले भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची गुप्त भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.

ही भेट आज (ता. २१ सप्टेंबर) दुपारी 1 वाजताच्या सुमारास 'मातोश्री'वर झाल्याचे समजते. या भेटीत काय चर्चा झाली ही माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Gautam Adani & Uddhav Thackeray Latest News)

सध्याच्या राजकीय परिस्थितीत झालेल्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून याभेटीमुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ होण्याची चर्चा जोरात रंगत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथ झाली असून यामुळे शिवसेनेमध्ये फूट पडलीच मात्र, राज्यात संत्तातरही झालं आहे. आदानी हे भाजपच्या जवळचे असल्याचे सांगत त्यांच्यावर सातत्याने विरोधक टीका करत असतात. दरम्यान त्यांंनी या नाट्यमय परिस्थितीत ठाकरेंची भेट घेतल्याने जोरदार चर्चा रंगत आहे.

आदानी यांच्या मार्फत काही राजकीय नवं समीकरणं तर तयार होत नाही ना ?, अशी चर्चाही रंगायला सुरूवात झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT