Udaya Samant
Udaya Samant Sarkarnama
मुंबई

1. 54 लाख कोटींची प्रकल्प गुजरातला; उद्योगमंत्री सामंत म्हणतात माहिती घेतोय

सरकारनामा ब्यूरो

Udaya Samant : मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) येऊ घातलेला फॉक्सकॉन कंपनीचा 1. 54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. हा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Udaya Samant) यांनी उत्तर दिले आहे. कंपनी गुजरातला का गेली याचा अभ्यास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाची गोष्ट आहे, की वेदांता आणि त्यांच्या सोबत असणारी कंपनी आज राज्यात येत नव्हती. त्यासाठी गेल्या दीड वर्षापासुन पाठपुराव सुरु होता. उद्योग मंत्री होऊन मला १५-२० दिवस झाला. नवीन मुख्यमंत्री होऊन दोन महिनेच झाले आहे. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही या कंपीना आधिच्या सरकारच्या तुलनेत अधिक सुविधा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तरी सुद्धा ही कंपनी गुजरातला का गेली, याची माहिती घेणार असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे.

तसेच राजकारण करण्यापेक्षा हा प्रकल्प पुन्हा राज्यात आण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. फक्त राजकारण करु नये, असा टोला आदित्य ठाकरे यांना लगावला. दरम्यान, माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकार टीका केली. सेमीकंडक्टर निमिर्ती प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारडून तैवानमधील कंपनीसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात होती, असे देसाई यांनी सांगितले होते. सुभाष देसाईजी आणि माझी वेदांता व फॉक्सकॉन यांच्याशी चर्चा झाली होती. आमच्या भेटीही झाल्या होत्या. त्या कंपन्यांच्या शिष्टमंडळाने ठिकाणांना भेटी दिल्या होत्या. त्यामध्ये तळेगाव (पुणे) येथे हा प्रकल्प उभारण्याचे ठरवले होते, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

दावोसमध्येही आमची चर्चा महाराष्ट्रात हा उद्योग येईल, अशाच पद्धतीने झाली होती. हा प्रकल्प पावणे दोन लाख कोटींचा आहे. या प्रकल्पाबरोबरच १६० छोट्या-मोठ्या कंपन्या येणार होत्या. हे सगळे होत असताना सकाळी गुजरात सोबत करार झाला, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सरकार आहे की नाही, असा प्रश्न पडला आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, कुठे गोळीबार होतो. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकार काम करत होतो. तेव्हा राज्यात आम्ही साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक आणली, असेही ठाकरे म्हणाले. ९० टक्क्यांहून अधिक सामजंस्य करार झालेले आहे. त्यांना जागा उपलब्ध करुन दिली आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास महाविकास आघाडी सरकारवर होता, असेही आदित्य यांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT