Fadanavis Governments Tree Plantation Will be Probed After Sayaji shindes Demand 
मुंबई

अभिनेते सयाजी शिंदेंच्या मागणीमुळे फडणवीस सरकारची वृक्ष लागवड अडचणीत

फडणवीस सरकारच्या काळातल्या 50 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी होणार आहे. ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी शंका उपस्थित केल्याने वनमंत्री संजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत

प्रशांत बारसिंग

मुंबई : फडणवीस सरकारच्या कालावधीत वन विभागाने केलेल्या वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचा मनोदय महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री यंजय राठोड यांनी व्यक्त असतानाच ही चौकशी होवूनच जाऊ द्या, असे आव्हान माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. या वादात अभिनेते सयाजी शिंदे यांनी उडी घेतल्याने वृक्षलागवडीचा वाद चांगलाच रंगण्याची शक्‍यता आहे.

फडणवीस सरकारच्या काळातल्या 50 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी होणार आहे. ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी शंका उपस्थित केल्याने वनमंत्री संजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मागच्या सरकारच्या माध्यमातून कोणी किती झाडे लावली, त्यापैकी किती झाडे जगली, यांची सॅटेलाइट इमेजेसच्या माध्यमातून चौकशी होणार आहे. चित्रपट अभिनेते आणि वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी वर्षभरापूर्वी वृक्ष लागवडीच्या चौकशीची पहिल्यांदा मागणी केली होती, त्या मागणीनंतर प्रचंड खळबळ उडाली होती.

वृक्षाच्छादन तसेच रोजगार, उत्पन्न वृद्धीच्या भावनेतून फडणवीस सरकारने तीन वर्षांपूर्वी वनेतर क्षेत्रातही वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला. फडणवीस सरकारच्या काळात 50 कोटी वृक्ष लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. यासाठी सुरु केलेल्या अभियानावर दरवर्षी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु, या अभियानातून अपेक्षित काम झाले नसल्याची शंका महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांनी व्यक्त केली. वनमंत्री संजय राठोड यांनी वन विभागाच्या प्रधान सचिवांना पाच वर्षांच्या काळात झालेल्या वृक्ष लागवडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

वृक्ष लागवडीची श्वेतपत्रिकाच काढा - मुनगंटीवार

वृक्ष लागवड झाली त्यावेळी सुधीर मुनगंटीवार वनमंत्री होती. वृक्षलागवडीची चौकशी करायला काही हरकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. माजी न्यायाधीशांच्या नेतृत्त्वात चौकशी समितीच नेमा. तसेच राज्यातील शंकाखोरांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी श्वेतपत्रिकाही काढा, अशा आशयाचे लेखी पत्र सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यसरकारला पाठवले आहे. 33 कोटी वृक्ष लागवड हे ईश्वरीय-पर्यावरण कार्य आहे. याच मोहीमेमुळे राज्यातील वनेतर क्षेत्रात जंगल वाढल्याची नोंद केंद्रीय वनसर्वेक्षण विभागाने केली, असा दावाही मुनगंटीवार यांनी केला आहे. तसेच ही वृक्ष लागवड वनविभागाने नव्हे तर 32 विभागांनी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी मिळून केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

70 वर्षातील चौकशी व्हावी - सयाजी शिंदे

जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी मागच्या 70 वर्षांत वृक्ष लागवड कशी झाली याची चौकशी व्हायला हवी, असे मत खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्‍त केले. बाकी या चौकशीतून काय साध्य होणार हा प्रश्न आहे. या चौकशीत न पडता, चांगली झाडे लावू आणि ती जगवू, तरुणांना घेऊन ही चळवळ मोठी करण्यात रस आहे, असे मत अभिनेते आणि सह्याद्री देवराई चळवळीचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, सरकारे बदलत राहतील आणि चौकशाही होत राहतील, यातून काय साध्य होणार माहिती नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT