Uddhav Thackeray, Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar Book : ठाकरेंनी संघर्षाऐवजी माघार घेतल्यानं सरकार पडलं; पवारांनी पुस्तकात स्पष्टच सांगितलं

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्याकडे राजकीय चातुर्याचा अभाव

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar on Uddhav Thackeray : महाविकास आघाडीचे सरकार खेचण्यासाठी भाजप सर्व प्रयत्न करणार याची जाणीव होती. मात्र शिवसेनेतच फूट पडेल यांचा अंदाज आला नाही. त्यानंतर निर्माण झालेल्या प्रसंगाला सामोरे जाण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी तात्काळ राजीनामा दिला. परिणामी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, अशी स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'लोक माझे सांगाती' या पुस्तकात व्यक्त केले आहे.

बंडाळीचा अंदाज नव्हता

पुस्तकात पवारांनी शिवसेनेत (Shivsena) बंडाळी होईल याचा अंदाज आला नसल्याची कबुली दिली आहे. पवार म्हणतात, "२०१९ मध्ये देशात एकहाती सत्ता मिळविलेल्या भाजपला राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष एकत्र येत महाविकास आघाडीचे (MVA) सरकार स्थापन झाले. या सरकारने एक प्रकारचे भाजपला आव्हानच दिले होते. त्यामुळे राज्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी भाजप सर्व प्रयत्न करणार याची जाणीव होती. मात्र उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करूनही शिवसेनेत वादळ उठेल याचा अंदाज नव्हता."

राजकीय चातुर्याचा अभाव

पवारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात राजकीय चातुर्याचा अभाव जाणवल्याचेही म्हटले आहे. पवार म्हणतात, "राज्याच्या प्रमुखाला राज्यातील घडामोडींची बित्तंबातमी आवश्यक असते. उद्या काय होऊ शकते याचा अंदाज घेण्याची क्षमता हवी. त्यानुसार आजच काय पावले उचलायला पाहिजेत याचे राजकीय चातुर्य आवश्यक असते. याचा आभाव उद्धव ठाकरे यांच्यात जाणवला. शिवेसनेतील बंडाळी रोखण्यास नेतृत्व कमी पडले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. परिणामी महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले."

'ही' बाब पचनी पडली नाही

कोरोना काळात मुख्यमंत्री फक्त दोनवेळाच मंत्रायलायात आल्याची बाब पचनी न पडल्याचे पवारांनी (Sharad Pawar) स्पष्टपणे सांगितले आहे. पवार म्हणतात, "शिवसेनेत फूट पडल्यानंतर राजकारणात सत्ता टिकविण्यासाठी वेळप्रसंगी वेगाने हलचाली कराव्या लागतात. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात संघर्ष करायला हवा होता. त्यांनी मात्र माघार घेतली. दरम्यान, कोरोना काळात सर्व नेते फिरून काम करीत होते तर मुख्यमंत्री या नात्याने ठाकरे ऑनलाइन माध्यमातून सर्वांशी संपर्कात होते. तसेच मुख्यमंत्री असूनही ते फक्त दोन वेळा मंत्रालयात आले, ही बाब पचनी पडली नाही."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT